*कन्हान शहरात बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मोत्सव थाटात साजरा*
*ताज ऑक्सीलवर स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरातील ब्रुक बाॅंड कंपनी समोर ताज ऑक्सीलवर स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे बाबा ताजुद्दीन यांच्या १६१ व्या जन्मोत्सव निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून बाबा ताजुद्दीन यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व प्रसाद वितरण करून बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
गुरुवार दिनांक.२७ जानेवारी ला बाबा ताजुद्दीन यांच्या १६१ व्या जन्मोत्सव निमित्य ताज ऑक्सीलवर स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे ब्रुक बाॅंड कंपनी समोर कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवर नागरिकांनी बाबा ताजुद्दीन यांच्या प्रतिमेचे पुजन व केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी नागरिकांना चिवडा व बासुंदी च्या प्रसाद वितरण करून बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी बहु संख्येने नागरिकांनी बाबा ताजुउद्दीन च्या प्रतिमेचे दर्शन घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.