Breaking News
महासत्तास्थापना 2019 महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी ट्वीस्ट ;
फडणवीस पुन्हा सीएम, तर अजित पवार उपमुख्यमंत्री!
मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
* भाजपने सत्तेचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे
*राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या गटानं भाजपच्या सरकारला पाठिंबा दिल्याची चर्चा
*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात झाला शपथविधी
*देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ… अजित पवार यांचाही उपमुख्यमंत्री ची शपथविधी.