*कन्हान तारसा चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन व कन्हान नदी पुलिया वरुन होणारे जड वाहतुक बंद करण्याची मागणी*
*रोडवर अवैधरित्या उत्खनन करुन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी*
*नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांचे कन्हान पोलीस निरीक्षकांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरातील तारसा चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन काही दिवसान पासुन कोळसा , रेती चे १४ व २० चाकी जड वाहन मोठ्या प्रमाणात जात असल्याने इतर वाहनांना व नागरिकांना त्रास होत असुन मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ कन्हान तारसा चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन व कन्हान नदी पुलिया वरुन होणारे जड वाहतुक बंद करण्याची व रोडवर अवैधरित्या उत्खनन करुन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .
शहरातील तारसा चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन काही दिवसान पासुन कोळसा रेती चे १४ व २० चाकी जड वाहन मोठ्या प्रमाणात सुरु झाले असुन सदर दोन्ही मार्ग हे १०-१२ फुटांचेच असल्याने इतर वाहनांना येण्या जाण्या करिता व स्थानिक नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत असुन मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . काही दिवसान पुर्वी गहुहिवरा चाचेर मार्गावर राजेश कोचे यांचा अपघात झाला असुन अनेक छोटे मोठे अपघात झाले असुन किती तरी लोक बचावले आहे व वरिष्ठ नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असुन जड वाहतुकी मुळे काही भागातील रस्ते खराब झाले आहे . गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद करण्याकरिता दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ ला नगर परिषद कार्यालय येथे सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली असुन या सभे मध्ये ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे . तरी सुद्धा गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद न झाल्यामुळे संदर्भीय पत्राद्वारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र-व्यवहार करण्यात आले असुन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे . गहुहिवरा चाचेर मार्गाची २५०० पीसीयु ६५०० मेट्रिक टन पर दिवस एवढी क्षमता असुन ही राजकीय नेत्यांचा फायदा घेऊन तारसा रोड ते गहुहिवरा रोड अंतर्गत १४ व २० चाकी जड वाहतुक ट्रक रेती व कोयला लादुन कन्हान येथुन घेऊन जातात . जनतेच्या जीवाचा खेळ करणारे ट्रान्सपोर्टर हे स्वत च्या फायदा साठी टोल नाका वाचवुन शासनांचा कर चोरी करतात . अश्यांवर कायद्याने गुन्हा दाखल करण्यात यावा . गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद करण्याकरिता स्थानिक नागरिकांनी नगर परिषद ला पत्र दिल्याने प्रशासनाने सर्व साधारण सभेत ठराव घेऊन सर्वानुमते मंजुर करण्यात आला असुन आमदार आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात जड वाहतुक बंद करण्यात आली . तरी सुद्धा दिनांक २० जानेवारी २०२२ ला सायंकाळी स्थानिक ट्रान्सपोर्टर च्या मालकांनी व कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार बर्वे , आकिब सिद्धिकी , जितु धुमाळ , नरेश बर्वे , नसीम शकील , वाडनकर , सह आदिंनी स्वत च्या व ट्रान्सपोर्टर च्या फायद्यासाठी रस्त्यावरील सीमेंट दगड जेसीबी मशीन द्वारे काढुन टाकले व तेथुन पुन्हा जड वाहतुक सुरु झाली . तसेच १५० वर्ष जुन्या कन्हान नदी पुलाची अवस्था जिर्ण असुन त्यावर शासनाचा कडक निर्बंध असुन सुद्धा जड वाहतुक सुरु आहे . सदर जड वाहतुक हे कन्हान पोलीस स्टेशन च्या समोरुन जात असुन सुद्धा कन्हान पोलीस विभाग निद्र अवस्थेत आहे . गहुहिवरा चौका मधुन सीसीटीवी फुटेज काढुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी राजकारणाच्या दबावाखाली जनतेचा जीवन व मरणाचा खेळ किती दिवस सुरु राहील हा प्रश्न निर्माण झाल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ कन्हान तारसा चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन व कन्हान नदी पुलिया वरुन होणारे जड वाहतुक बंद करण्याची व रोडवर अवैधरित्या उत्खनन करुन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष डायनल शेंडे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , शहर प्रमुख छोटु राणे , नगरसेवक अनिल ठाकरे , राजेंद्र शेंदरे , चिंटु वाकुडकर , अजय चव्हान , प्रकाश तिवारी , हरीष तिडके , शमशेर पुरवले , सह आदि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .