*वराडा व घाटरोहणा येथील दोन घटनेत बिबटया च्या हल्ल्यात १ कारवड, १ गोरा ठार*
*कन्हान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा वराडा व घाटरोंहणा गाव आणि शेत शिवारात सतत दोन दिवस बिबटयाने हल्ला करून एक जर्शी कारवड, एक गोरा असे दोन प्राळीव जनावरे ठार केले. तर आता पर्यंत परिसरातील ९ घटनेत जर्शी कारवड- ५, गोरा- १, बकरी – ४, कुत्रा- १ असे ११ प्राळीव जनावराना ठार केले तर ४ जनावरांना जख्मी केल्याने पेंच व कन्हान नदी काठावरील घाटरोहणा, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, टेकाडी, वराडा, एसंबा, वाघोली नांदगाव, बखारी, गोंडेगाव कोळसा खदान व जवळपास च्या परिसरात पुन्हा भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वनपरिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेंज मधिल वराडा येथील शेतकरी श्री कैलाश गंगाधर घोडमारे यांचे मालकी शेत गोठयात शुक्रवार (दि.२८) ला रात्री ८ ते १० पाळीव गाई आपल्या शेत गोठयात पाळीव जनावरे बाधुन आपल्या घरी आले.नेहमी प्रमाणे शनिवार (दि.२९) ला सकाळी शेतात गेले असता पहाटे ४ ते ५ वाजता दरम्यान जर्शी लाल रंगाची कारवड ला बिबट्या ने ठार केल्याचे दिसल्याने ग्रामस्थाच्या मदतीने वनविभाग पटगोवारी वन रक्षक श्री एस जी टेकाम ला भ्रमणध्वनीने माहीती दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहायक अशोक द्विग्रेसे साहेबांना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वन कर्मी ला सोबत घेऊन पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंच १) कुणाल प्रकाश देऊरकर २) अमित निलकंठ घारड दोन्ही राहणार. वराडा या पंचाचे साहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी ए सी दिग्रेस याना दिला. गावकरी नागीरक व पिडित शेतकरी पशु मालक कैलास घोडमारे यांच्या दोन वर्षाच्या जर्शी कारवड ला ठार केल्याने पशु मालक कैलास घोडमारे यांचे १५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याने गावातील नागरिक व पिडीत शेतकरी यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम याचेशी चर्चा करून मृत कारवड चे नुकसान भरपाई म्हणुन १५ हजार रूपये आर्थिक सहाय्यता त्वरित मिळवुन दयावी अशी मागणी केली.
घाटरोहणा येथील दिड वर्षाचा गोरा बिबटयाच्षा हल्लात ठार .
घाटरोहणा येथील शेतकरी शंकर मुरलीधर छानिकर हे आपल्या शेत शिवारातील गोठयात शनिवार (दि.२९) ला सायंकाळी पाळीव जनावरे बांधुन घरी आले. रविवार (दि.३०) ला नेहमी प्रमाणे सकाळी शेतात गेले असता दिड वर्षा गोरा न दिसल्याने आजु बाजुला पाहीले असता झाडझुडपी मध्ये गोरा मृत अव स्थेत दिसुन आल्याने पहाटे बिबटयाने शिकार करून ठार केल्याचे निर्देशनात आल्याने ग्रामस्थाच्या मदती ने वनविभाग पटगोवारी वनरक्षक श्री एस जी टेकाम ला भ्रमणध्वनीने माहीती दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहायक अशोक द्विग्रेसे साहेबांना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वनकर्मी ला सोबत घेऊन पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून दोन पंचाचे सहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी ए सी दिग्रेस याना दिला. गावकरी नागरिक व पिडित शेतकरी पशुमालक शंकर छानिकर यांच्या दिड वर्षाच्या जर्शी गोऱ्यास ठार केल्याने पशु मालकाचे २२ हजार रूपयांचे नुकसान झाल्याने गावातील नागरिक व पिडीत शेतकरी यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम याचेशी चर्चा करून मृत गोऱ्याची नुकसान भरपाई म्हणुन २२ हजार रूपयाची आर्थिक सहाय्यता त्वरित मिळवुन दयावी अशी मागणी करण्यात आली.
मागील एक ते दिड महिन्यात बखारी शेतशिवा रात दोनदा -३, गाडेघाट येथे जर्शी कारवड व कुत्रा, पिपरी – जर्शी कारवड, वराडा येथील दोनदा – जर्शी कारवड २ व एक जख्मी, एंसबा गाव शिवारात एक बकरी – व एक बकरी जख्मी, घाटरोहणा – गाव शिवा रात -१ बकरी ठार व २ जख्मी आणि शेतात १ गोरा ठार अश्या नऊ वेळा बिबटयाने हल्ला करून जर्शी कारवड ५, गोरा १, बक-या ४ आणि १ कुत्रा असे ११ पाळीव जनावरे ठार करून ४ जनावरांना जख्मी केल्याने पेंच, कन्हान नदी काठावरील बखारी ते पिपरी च्या परिसरातील संपुर्ण गावामध्ये शेतकरी व ग्रामस्था मध्ये बिबटयाने भंयकर भितीचे वातावरण निर्माण केले आहे. तरी सुध्दा वन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना या बिबटयाचा शोध न लागणे ही सुध्दा एक शोकांतिका म्हणावी लागेल. यास्तव वन विभागा ने बिबटयाचे थैमानास त्वरित आळा घालण्यास बिबटयास पकडुन घनदाट वनक्षेत्रात नेऊन सोडुन शेत करी व ग्रामस्थाना भय मुक्त कऱण्याची मागणी जोर धरू लागली आहे.