*कन्हान येथे बालक बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात संपन्न*
*भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तुन साकारित स्वस्थ बालक बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन दिवटे यांच्या निवासस्थानी करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा संध्याताई गोतमारे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा नागपुर जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्षा प्रितीताई मानमोळे , जिल्हा महामंत्री प्रतिभा गवळी , शुभांगी गायधने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले . त्यांनतर कार्यक्रमात उपस्थित बालक बालिकाची लुट करण्यात आली असुन मान्यवरांच्या महिलांना वान वाटप करुन स्वस्थ बालक बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष स्वाती पाठक , शालीनी बर्बे , मंत्री पौर्णिमा दुबे , भाजपा महिला आघाड़ी पारशिवनी तालुका अध्यक्ष सरिता लसुंते , कांद्री ग्रामपंचायत सदस्या अरुणा हजारे , सावित्री ठाकरे , टेकाडी ग्रामपंचायत सदस्या सिंधुताई सातपैसे ,सुरेखा कांबळे , सुधा सेलोकर , शालीनी कंगाले , यादव ताई सह आदि महिला मोठ्या संख्येत होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी अध्यक्ष तुलेषा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेविका संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , अनिता पाटील , वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , सुनंदा दिवटे , मीना कळंबे , वैशाली शेंदरे , प्रतिक्षा चवरे , सह आदि ने सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संगीता खोब्रागडे यांनी केले तर आभार शालीनी बर्बे यांनी मानले.