*कन्हान ते आमडी फाटा महामार्गावर कोळसा, रेती वाहतुकीने धुळीचे साम्राज्य*
*महामार्गावर धुळ प्रदुर्शनाने अपघात वाढले तरी संबधित अधिकारी कुंभकर्णी च्या झोपेत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान ते आमडी फाटा परिसरातील महामार्गावरून कोळसा, रेती चे ट्रकाने निमय बाहय जड वाहतुक बिनधास्त सुरू असल्याने महामार्गावर व लगत कोळसा, रेतीची धुळ साचुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाने रस्त्यावर उडत असल्याने चारचाकी, दुचाकी वाहनांना समोरील काहीच दिसत नसल्याने अपघात होऊन निर्दोष लोकांना अपंगत्व किंवा जिव सुध्दा गमवावा लागत असल्याने संबधित प्रशासन अधिकाऱ्यां नी कुंभकर्णी च्या झोपेत तुन निद्रा अवस्थेतुन जागे होऊन धुळ प्रदुर्शन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करून धुळ प्रदुर्शनावर नियंत्रण करण्यात यावे अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे .
नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील कन्हान नदी पुल ते आमडी फाटा पर्यंत राष्ट्रीय महामार्गाने कोळसा व रेतीचे नियम बाहय म्हणजे १० ते २० चाकी ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त कोळसा व रेती भरून टाळपत्रीने व्यवस्थित न झाकता वाहतुक करण्यात येत असल्याने कोळसा, रेतीची बारीक कणा ची धुळ उडत असल्याने छोटया वाहन चालकांना सामोर चे काहीच दिसेनाशे होते. तर कधी डोळयात जावुन अचानक सामोरचे काहीच दिसत नसल्याने वाहन चालकाचे संतुलन बिघडुन अपघात होत आहे. रस्त्यावर व लगत धुळ साचुन असल्याने वाहनाची चाके घसरून सुध्दा अपघात वाढत आहे. कन्हान नदी व पेंच नदीतुन मोठया प्रमाणात रेती (वाळु)उपसा होत ट्रकने वाहतुक सुरू आहे. तसेच वेकोलि कामठी, इंदर, गोंडेगाव या तीन्ही खुल्या कोळसा खदान मधुन डुमरी रेल्वे कोळसा यार्ड मध्ये आणि इतर ठिकाणी ट्रकने कोळसाची वाहतुक याच महामार्गाने होत असल्याने महामार्गावरील टेकाडी नविन वसाहत ते अण्णा मोड डुमरी, आमडी फाटा पर्यंत मोठया प्रमाणात कोळसा रेतीची धुळीचे प्रदुर्शन दिवसरात्र होत असल्याने इतर ये – जा करणाऱ्या वाहन चालकांना या उडणाऱ्या धुळी मुळे भयंकर त्रास सहन करावा लागत असुन टेकाडी नविन वसाहत ते टेकाडी बस स्टाप व केरडी, डुमरी स्टेशन ते अण्णा मोड, आमडी फाटा पर्यंत राष्ट्रीय महामार्गावर कोळसा व रेतीच्या बारीक कण मिश्रीत धुळ प्रदुर्शन मोठया प्रमाणात असल्याने या ठिकाणी अपघाता चे दिवसेन दिवस प्रमाण वाढु लागले आहे. ट्रकाच्या उडणाऱ्या धुळीने वाहन चालकांना सामोरील काहीच दिसत नसल्याने वाहन चालकांचे संतुलन बिघडुन अपघात होऊन निर्दोष लोकांना अपंगत्व आणि जिव हानी सुध्दा होत आहे. करिता राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंडळ अधिकारी, आरटी ओ अधिकारी, वाहतुक पोलीस तसेच सर्व संबधित अधिकाऱ्यां च्या दुर्लक्षतेमुळे महामार्गावर धुळ प्रदुर्शन वाढुन अपघात वाढत असल्याने संबधितानी कर्तव्य दक्ष पणे कामगिरी बजावुन कन्हान नदीपुल ते आमडी फाटा राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील कोळसा, रेती धुळ प्रदुर्शनावर त्वरित नियंत्रणात करावी अन्यथा येणाऱ्या उन्हाळयात या धुळ प्रदुर्शनाने अपघाताच प्रमाण आटोक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी मागणी या महामार्गाने प्रवाश करणाऱ्या प्रवाशी तसेच परिसरातील ग्रामस्थाच्या चर्चेतुन सामोर येत आहे.