*कांद्री च्या तीन दुकानात अज्ञात चोरट्यांनी केला ३१,००० रुपयाचा मुद्देमाल चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कांद्री च्या तीन दुकानात अज्ञात चोरट्यांनी केला ३१,००० रुपयाचा मुद्देमाल चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील धन्यवाद गेट समोर कांद्री येथील असलेल्या तीन दुकानात अज्ञात आरोपींनी रात्री चोरी करून ३१ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.१ फ्रेब्रुवारी सायंकाळी ७ ते बुधवार दिनांक.२ फेब्रुवारी २०२२ ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कांद्री धन्यवाद गेट समोर असलेल्या फिर्यादी हसन मंजर खाजेमन्सुर वय २२ वर्ष राहणार. हरीहर नगर वार्ड नंबर.१ कांद्री यांचे पंचरचे दुकान असुन दुरुस्ती करीता आलेले जुने वापरले लोखंडी डिक्स २ नग किंमत ४ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेला आणि शेजारी दुकानदार मोहम्मद ताहीर अंन्सारीचे ८ नग टैक्स किमंत १६ हजार रुपयाचे तसेच बाबु अंसारी यांचे दुकाना समोरून ३ डिक्स व ट्रक हाउजिंग ११ हजार रुपये असा तिन्ही दुकानातील एकुण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी हसन मंजर खाजे मन्सुर यांच्या तोंडी तक्रारी वरून व पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे आदेशाने अपराध क्रमांक ४४/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक फौजदार गणेश पाल हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …