*एका गाईसह वासराची बिबट्याने केले शिकार ; बोरडा सराखा शिवारातील घटना*
रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक – रामटेक पासून 15 कि. मी.अंतरावर असलेल्या बोरडा सराखा येथील शेतकरी श्री.दशरथ नामदेव राऊत (सारंग राऊत) यांच्या शेतात रात्री अंदाजे जवळपास 12 ते 2 वाजताच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या शेतात बांधलेले जनावरे यांच्यावर हल्ला करून एका गाईसह तिच्या वासराला ठार केले आहे.ही घटना गावालगत असलेल्या शेतात घडल्याने या घटनेने संपूर्ण बोरडा गाव हादरून गेल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.प्राप्त माहिती नुसार कु.सतीश सुखदेव भरडे हे रात्री राऊत यांच्या शेतावर मुक्कामी होते.रात्री अचानक त्यांच्या शेतात बिबट्या येऊन गाईसह वासराला ठार केले.पण ते झोपीत असल्याने त्यांना या घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच कल्पना नसल्याचे समजते. गायीला जागीच ठार करून वासराला जवळपास 200 ते 300मिटर अंतरापर्यंत दुसऱ्याच्या शेतात ओढत नेले.या घटनेनंतर तात्काळ या घटनेसंबंधीची माहिती वनविभागाला देण्यात आली.त्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी येऊन पंचनामा केला.पुढील तपास वनविभाग करीत आहे.गावाजवळील शेतात येऊन शिकार केल्याने या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गरीब शेतकऱ्याला त्यांचा मोबदला त्यांना तात्काळ मिळावा असे गावकऱ्यांचे वनविभागाला मागणी केली आहे.