प्रहारच्या नेतृत्वात बंगाली कॅम्पवासीयांची महावितरण कार्यालयावर धडक.
(चार दिवसांत काम सुरु करू,उप. अभियंताचे आश्वासन)
आवारपूर गौतम धोटे :-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बंगाली कॅम्पवासी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून अक्षरशः नरकयातना भोगत आहे.येथील परिवाराचा पाणी,विज,रस्ते, नालीसह इतर मुलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असून अनेकदा संबंधितांसह आमदार,खासदारांना निवेदने देऊन व्यथा मांडली परंतु स्थानिक माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाच्या दबावतंत्राखाली याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप कॅम्पवासी आवर्जून करताना दिसतात.स्वतंत्र देशात आदिवासी भागातील सदर नागरिक आजही अंधकारमय जीवन जगत असल्याने याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.मात्र आता या सर्व समस्यांना घेऊन प्रहार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे.विद्युत पुरवठा करा,या मागणीला घेऊन २२ नोव्हेंबर रोजी प्रहारच्या नेतृत्वात समस्त बंगाली कॅम्प वासीयांनी मोर्चाच्या स्वरुपात येथील विज वितरण कार्यालय उप अभियंतांना निवेदन दिले.चार दिवसात सदर ठिकाणी काम सुरु करण्याचे आश्वासन अभियंता इंदूरकर यांनी उपस्थितांना दिले मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास येत्या शुक्रवार रोजी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
बंगाली कॅम्पवासी मागील ३०,३५ वर्षांपासून ग्रामपंचायत,नगरपरिषद,तालुका व जिल्हा प्रशासन ते लोकप्रतिनिधी, मंत्र्यांपुढे सतत हकिकत मांडत आहे.२००८ यावर्षी ८ महिने साखळी उपोषण करणात आले.जवळपास सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन केवळ आश्वासनांची खैरातच वाटली मात्र समस्यांचे समाधान झाले नाही.याठिकाणी जवळपास १३५ मुलांची अंगणवाडी अस्तित्वात आहे पण ताटव्याच्या अंधाकारमय झोपडीत,सर्वांचे शिक्षण सुरु आहे.परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने लहान मुलांचा सर्पदंशाने मृत्यू सुद्धा होत आहे.अशा परिस्थितीत येथील रहिवासी जिवन जगत असून मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथील अंदाजे चार,पाचशे नागरिकांनी नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.आणि जर आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यास आगामी नगरपरिषद निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकू असा इशारा ही देण्यात आला आहे.निवेदन देताना प्रहारचे जिल्हा प्रमुख राहुल पांडव कोरपना तालुका अध्यक्ष सतिश बिडकर,पंकज माणूसमारे सुरज बार,सत्वशिला घुले, अनील मख,जयदेव मंडल,गणेश बनिक,विश्वनाथ पतंगे,जगन्नाथ, महालदार,शोभा मेश्राम,बनमाला बिस्वास,नमीता मंडल,ललीता सोरतेसह जवळपास समस्त बंगाली कॅम्पवासी मानला,पुरूष नागरिकांची उपस्थिती होती.