*मोठी बातमी*
*केरडी बस स्टाॅप जवळ इनोवा वाहनाची दुचाकीला धडक , एका युवकाचा मृत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला इनोवा वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या केरडी बस स्टाॅप जवळ इनोवा वाहन चालकाने खंडाळा डुमरी वरून कांद्री कडे जाणाऱ्या दुचाकी वाहना ला मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक शेखर ठाकरे या युवकांचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून इनोवा वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.८ फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ७ ते ७:३० वाजता दरम्यान फिर्यादी ताराचंद पंजाबराव ठाकरे वय ३६ वर्ष राहणार. खंडाळा (डुमरी ) यांचा लहान भाऊ मृतक शेखर सुर्यभान ठाकरे वय ३४ वर्ष राहणार. खंडाळा (डुमरी) हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० टी २७१५ ने खंडाळा (डुमरी) वरून कांद्री येथे जात असतांना केरडी फाट्या बस स्टाॅप जवळ मागुन येणारी इनोवा चारचाकी वाहन क्रमांक. एपी ०९ बीयु ८०५५ च्या चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाहना ला मागुन जोरदार धडक मारल्याने दुचाकी वाहन चालक शेखर ठाकरे हा खाली पडल्याने रस्त्याचा जबर मार लागुन रक्त स्त्राव झाल्याने उपचाराकरिता रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच मरण पावला व रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी ताराचंद पंजाबराव ठाकरे यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी इनोवा चारचाकी वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) भादंवि, १८५ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .