*बीग ब्रेकींग*
*विक्की ऊर्फ विवेक नगराळे यांस जन्मठेप*
*मुतकेच्या मु्त्यू दिनीच आलाच जन्मठेपेचा निकाल*
*महाराष्ट्राला हादरविणारावून सोडणाऱ्या बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणात आरोपीला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा*
वर्धा-हिंगनघाटः संपुर्ण महाराष्ट्राला हादरविणारावून सोडणाऱ्या तसेच गेल्या दोन वर्षांपासून सर्वाचे लक्ष वेधून असलेल्या हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणाचा निकाल आज गुरुवारी १० फेब्रुवारीला शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर बी भागवत यांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.*
*या पुर्ण खटल्यात एकुण २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असुन या खटल्याचे न्यायालयीन कामकाज ६४ वेळा चाचलले आहे.९ फेब्रुवारीला न्यायालयाने आरोपीला या खटल्यात दोषी ठरवले होते.आज गुरुवारी १० फेब्रुवारीला या बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणाचे कामकाज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ९ वाजुन ४५ मिंटाने सुरू झाले. सरकारी पक्षातर्फे ॲड उज्वल निकम तर आरोपी पक्षातर्फे ॲड भूपेंद्र सोने यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली त्यांनंतर १२ वाजुन .४५ मिंटाने न्यायालयाने या खटल्याआ संदर्भात न्यायालयानी कामकाज पुर्ण केले.*
*त्यांनंतर सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि आरोपीचे वकील ॲड भूपेंद्र सोने यांनी प्रसारमाध्यमांच्या सोमोर येऊन या खटल्याचा निकाल ५ वाजता न्यायमूर्ती देणार असल्याचे सांगितले. ५ वाजता आरोपी विक्की नगराळे उर्फ विकेश नगराळे याला न्यायमूर्ती आर बी भागवत यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.या निकालावर आरोपींचे वकील ॲड भूपेंद्र सोने समाधानी नसल्याने ते पुढिल कोर्टात निकालाच्या विरोधात धाव घेणार आहे.*
*बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा असलेल्या न्याय आज मिळाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले आहे*