*राज्यपालांनी घोषीत केलेल्या शेतकऱ्यांनच्या तुटपुज्या नुकसान भरपाईवर शेतकरी असंतृष्ट.*
*सावनेर तालुक्यातील भेडाळा वासीयांनी उभ्या पीकावर फीरवीले ट्ँक्टर*
*हेक्टरी नाही तर एकरी कीमान 25 हजार रुपये नुकसान भरपाई ची मागणी*
मुख्य संपादक-किशोर ढूंढेले
*सावनेरःमागील महीण्यात नागपुर जिल्हाच नव्हे तर विदर्भ संपुर्ण भागात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनच्या पीकावर फटका बसला होता व जास्त प्रमाणामध्ये धान,कपासी,सोयाबीन या पीकांचे अतोनात नुकसान झाले नेहमीप्रमाणे नागपूर जिल्यातील क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणामध्ये कापशीची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे कपासीवरील बोडं हीरावून गेले तर झाडाची वाढ़ही झाली नाही या पिकाचे पुर्ण पणे नुकसान दीसुन आल्याने क्षेत्रातील शेतकर्यांनी आपल्या ऊभ्या पीकांनवर ट्रँक्टरचे रोटावेटर फीरवून पूर्ण पीक नष्ट केले.*
*शेतकऱ्यांच्या नुकसान झाल्यामुळे राज्यपाल यांनी तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 8 हजार जाहीर केले होते. मात्र नुकसान जास्त् रुपयाचे असल्याने शेतकऱ्यांनी 25 ते 50 हजार रुपये ऐकरी रुपयाची नुकसान भरपाईची मागनी शेतकऱ्यांनी केली आहे.तर लागत रक्कमेच्या खाली नुकसान भरपाई राजपाल तर्फे देण्यात आली आहे या मुळे शेतकऱ्याच्या मनांत निराशा प्रसरली आहे*
*तर एकीकडे लोकप्रतिनिधी यांनी खुर्चीचा खेळ मांडून ठेवल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणार तरी कोण अशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकर्यांची झाली आहे.वेळ राहता शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकर्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास बाध्य झाल्याशिवाय पर्याय उरणार नाही…*