*कांन्द्री वाईन शाॅप समोरुन दुचाकी वाहन चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वाॅईन शाॅप समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकी वाहन चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील आरोपी चा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी ४:०० ते रात्री १२:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी हर्ष ओमप्रकाश कश्यप वय १८ वर्ष राहणार मडीबाबा खदान नंबर तीन कन्हान याने आपली हिरो हंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० बीजी ५२०४ किंमत ४५,००० रुपए हे वाईन शाॅप कांद्री कन्हान येथे उभी करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी हर्ष ओमप्रकाश कश्यप यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .