*कांद्री येथे युवकाने गळफास लावुन केली आत्महत्या*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ ला सकाळ च्या सुमारास मृतक दिनेश सिंह वय १९ वर्ष राहणार हरीहर नगर , वार्ड क्रमांक एक , कांद्री , कन्हान ह्याने आपल्या घरच्या खोलीत गळफास लावुन आत्महत्या केली . मागील वर्षी मृतक दिनेश सिंह ह्याने प्राविण्य सुची मध्ये १२ वी ची परीक्षा पास केली होती . आत्महत्या चे कारण अध्यापही स्पष्ट झालेले नाही . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन शव विच्छेदना करीता कामठी रुग्णालय पाठविले आहे . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कलम १७९ भांदवि अन्वये मर्ग चा गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .