*चित्रपटातील अभिनेता गगन मलिक बनले श्रामनेर*
*बौद्ध भिक्षु संघात गगन मलिक यांनी केला प्रवेश*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशातच नाही तर याव्यतिरिक्त विश्वात जन-जनापर्यंत पोहचण्याचे निरत्तंन प्रयत्न करण्यात येत आहे. या चित्रपटातील अभिनेता आणि भगवान बुद्ध यांची भूमिका पार पाडणारे प्रसिद्ध सिने अभिनेता गगन मलिक थाईलेंड चे वॉट थाओंग (रॉयल मिनेस्ट्रोनी)
बुद्धिस्ट टेम्पल मध्ये इंडो-थाई बौद्धगया हेड मंक (भिक्षु)यांचा हस्ते १० फेब्रुवारी २०२२ रोजी १५ दिवसा करीता श्रामनेर ची दीक्षा घेतली.
सविस्तर माहिती एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे अहिल्याबाई होळकर बहुदेशीय शिक्षण संस्था, नागपुर तसेच गगन मलिक फाउंडेशन प्रमुख नितिन गजभिये यांनी दिली. सिने अभिनेता गगन हे मागील अनेक वर्षांपासून विश्वात करुणा, मैत्री, शांती ,अहिंसा, समता, स्वतंत्रता, बंधुभाव आणि न्यायाचा संदेश देतात.
महाकारुनीक तथागत भगवान बुद्ध आणि प्रियदर्शी सम्राट अशोक यांचाशी प्रभावित होऊन संपूर्ण भारत देशात ८४ हज़ार बुद्ध मूर्तिचे वितरीत करत आहे. यांची सुरवात २ वर्ष महाबोधि, महाविहार, बौद्धगया येथुन करण्यात आली आहे. यानंतर काही शहरात जात नागपुर, दिल्ली, मुंबई, बालाघाट, शिवणी, परभणी, औरंगाबाद, कामठी, बुद्धा स्पिरिचूअल पार्क कन्हान आदि ठीकाणी ३००० पेक्षा जास्त ठीकाणी बुद्ध मूर्ती देण्यात आली.
थाईलेंड येथे गगन मलिक श्रामनेर झाल्यानंतर एक नवीन नाव देण्यात आले आहे .जाना आता बौद्ध भिक्षु अशोका यांचा नावाने ओळखेल.
भारत देशामध्ये ८४ हज़ार बुद्ध मूर्ति प्रस्तुत समारोह अंतर्गत समूचे भारत बुद्ध मूर्ति वितरित करण्यात येईल.अशी अधीक माहीती नितिन गजभिये यांनी दिली.