*कन्हान येथे भव्य रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी* *रांगोळी स्पर्धेत प्रथम कु.आरती साकोरे , द्वितीय सविता बावने , आणि तृतीय वेदिका महल्ले* *माझी वंसुधरा अभियान अंतर्गत कन्हान – पिपरी नगर परिषद द्वारे रांगोळी स्पर्धेचे आयोजन*

*कन्हान येथे भव्य रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी*

*रांगोळी स्पर्धेत प्रथम कु.आरती साकोरे , द्वितीय सविता बावने , आणि तृतीय वेदिका महल्ले*

*माझी वंसुधरा अभियान अंतर्गत कन्हान – पिपरी नगर परिषद द्वारे रांगोळी स्पर्धेचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य माझी वंसुधरा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन रांगोळी स्पर्धेचे सुरवात करण्यात आली असता रांगोळी स्पर्धेत प्रथम , द्वितीय , आणि तृतीय आलेल्या विजेत्यांचा बक्षीस , रोख सम्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .


शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य महाराष्ट्र शासनाच्या माझी वंसुधरा अभियान २.० , स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता या भव्य रांगोळी स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला असुन सर्व स्पर्धकांना जल , वायु , कचरा , माझी वंसुधरा , स्वच्छता , आणि स्वच्छ भारत अभियान या संबंधित रांगोळी काढुन संदेश देण्याचा सुचना देण्यात आल्याने सर्व स्पर्धकांनी त्यांच आधाऱ्या वर रांगोळी काढुन नांगरिकांना संदेश दिला . त्यानंतर वैशाली बेलनकर व अजय भोसकर यांनी स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळी चे परिक्षण करुन बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन या भव्य रांगोळी स्पर्धे मध्ये शिवाजी नगर येथील कु.आरती सकोरे हिने प्रथम क्रमांक पटकाविले असुन स्वामी विवेकानंद नगर येथील सौ.श्रीमती सविता बावने यांनी द्वितीय क्रमांक पटकाविले असुन शिवाजी नगर येथील कु. वेदिका महल्ले हिने तृतीय स्थान पटकाविले . त्यानंतर या भव्य रांगोळी स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना व स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांचा हस्ते सर्वांना बक्षीस , रोख सम्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेविका वर्षा लोंढे , रेखा टोहणे , नगरसेवक अनिल ठाकरे , अभियानाचे नोडल अधिकारी संकेत तलेवार , नितु तिवारी , कन्हान पोलीस स्टेशन चे गुन्हे शाखा निरीक्षक यशवंत कदम , पोलीस उपनिरीक्षक काकडे मॅडम , हेड कांस्टेबल खुशाल रामटेके , हवालदार जियालाल सहारे , प्रवीण पाटील , हरीष तिडके , अजय चव्हान , भरत पगारे , प्रकाश तिवारी , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …