*दुर्मिळ खवल्या मांजराच्या खवल्याची तस्करी ; तीन आरोपींना अटक* *नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील क्रमांक 44 वरील घटना*

*दुर्मिळ खवल्या मांजराच्या खवल्याची तस्करी ; तीन आरोपींना अटक*

*नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील क्रमांक 44 वरील घटना*

रामटेक प्रतिनिधी: पंकज चौधरी
रामटेक – दुर्मिळ खवल्या मांजराच्या खवल्याची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळता नागपूर वन विभाग वन्यजीव विभागाच्या चमूने जाळ रचून विशेष पथकाद्वारे पवनी- देवलापार बोथिया-पालोरा गावाजवळ नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर २.७० किलो खवले मांजराच्या खवल्यासह तीन आरोपींना वन विभागाने अटक केली. ही घटना काल गुरूवारच्या रात्री ८ वाजता सुमारास उघडकीस आली.आरोपीकडून खवल्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेले मोटरसायकली वन विभागाने ताब्यात घेतल्या. आरोपीचे नावे प्रभाकर मरस्कोल्हे, शालिकराम इडपाची आणि सुखदेव जाधव आहे. सर्व आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार ९,३९,४४,४८ ए,४९ बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ वनपरीक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ , पवनी येथील भोंगाडे, करीत आहे.अशीच खवल्या मांजराच्या शिकारीची घटना दीड वर्षापूर्वी 18 मे 2020 ला पेंच व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या चोरबाहुली वनपरीक्षेत्र अंतर्गत किरंगिसर्रा गावात घडली होती. हा भाग जंगलव्याप्त असून अशा घटना या भागात वारंवार घडत असतात त्यामुळे वनविभागाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …