*कन्हान परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी*
*”जय भवानी जय शिवाजी” , “तुम्हचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय” च्या जयघोषाने दुमदुमले परिसर*
*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत विविध कार्यक्रमाने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
*भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर*
भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष स्वाती पाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी मुलचंद शिंदेकर , सुनिल लाडेकर , भरत सावळे , कामेश्वर शर्मा , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका , अनिता पाटील , सुषमा चोपकर , संगीता खोब्रागडे , वर्षा लोंढे , सुनंदा दिवटे , सरिता लसुंते , तुलेषा नानवटकर , प्रतीक्षा चवरे , संगीता देशभ्रतार , रिंकेश चवरे , मयुर माटे , सचिन वासनिक , अमोल साकोरे , मनोज कुरडकर , अमन घोडेस्वार , सौरभ पोटभरे , ऋषभ बावनकर , विक्की सोलंकी , अजय लोंढे , संजय रंगारी , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*सार्वजनिक वाचनालय , कन्हान*
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे यांच्या हस्ते व पत्रकार कमलसिंह यादव , दिनकरराव मस्के , प्रकाशराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व सभासदांनी व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले व फळ आणि प्रसाद वितरण करुन शिवजयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी रोशन तांडेकर , शुभम कावळे , नितिन मोहणे , सुरेंद्र नेवारे , हर्षल नागपुरे , उदय पाटील , सुरज जांडेकर , आशिष घोरपडे , शुभम शेंडे , विक्की कनोजे , अल्का कोल्हे , प्राची गिऱ्हे , मिलींद वाघधरे , राहुल पारधी , रवि वानखेडे , अभिषेक निमजे , पुष्पा बर्लेवार , मयुरी गिऱ्हे , कुमार अर्थव गिऱ्हे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*शिवशाही ग्रुप कांद्री , कन्हान*
शिवशाही ग्रुप कांद्री द्वारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य भव्य पालखी यात्रा मिरवणुक काढुन शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
कांद्री बस स्टाप जवळ पोटभरे निवास येथे शिवशाही ग्रुप कांद्री व्दारे राजे छक्रपती शिवाजी महाराज हयाच्या प्रतिमेस बैलबंडी वर सजावट करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ !! जय शिवराय !! च्या जय घोषात पालखी मिरवणुकीची कांद्री येथुन फुलाचा वर्षाव आणि डि जे च्या गर्जात मुले, युवक, युवती व महिला पुरूषा नाचत जयघोष करित सुरूवात करून राष्ट्रीय महामार्गाने तारसा रोड चौक, आंबेडकर चौक, शिवाजी नगर कन्हान येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन आणि जयघोष करून परत कांद्री येथे समापन करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साज रा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता
कुशल पोटभरे, चेतक पोटभरे, मयुर पोटभरे, दीपक ढोबळे, लेकराज पोटभरे, कुणाल देऊळकर, श्रीधर ठाकरे सह शिवशाही ग्रुप कांद्री मित्र मंडळी आणि ग्रामस्थ नागरिक बहु संख्येने उपस्थित होऊन सहकार्य केले .
*इंदर कोळसा खदान येथे शिव जन्मोत्सव साजरा*
वेकोलि इंदर खुली कोळसा खदान येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य इंदर खुली खदान येथे कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक मा.श्री विनय कुमार साहेब व खदान प्रबंधक श्री उमेश चंद्रा साहेब यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय घोष करित विन्रम अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना प्रसाद वितरण करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वेकोलि इंदर खुली कोळसा खदान चे कामगार बहु संख्येने उपस्थित होते .
*श्री हनुमान मंदिर टेकाडी*
श्री हनुमान मंदिर चौक टेकाडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
श्री हनुमान मंदीर चौक टेकाडी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला श्री हनुमान मंदिर टेकाडी चे अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे व सचिव नत्थुजी मोहाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि जयघोष करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सरपंचा सौ. मीनाक्षी बुधे , मनगटे ताई , मनोज लेकुरवाडे , सुनिल चिंचुलकर , नन्दु लेकुरवाडे , गंगाधर आकोटकर , रमेश बालपान्डे , अजित मोहाडे , हेमंत राउत , आकाश घोगरे , मनोज बोराडे , मनिश कुरडकर , सोरभ नाकतोडे , प्रविण चव्हाण , मयुर सेलोकर , मनु पावडे , हरिचन्द्रजी ठाकरे , रवीन्द्र गणोरकर , गणेश मस्के , अमित वासाडे , देवेन्द्र सेंगर , लोकेश चिचुलकर , वसंता केकतपुरे , मुलचंद सातपैसे , श्रीकांत राऊत , प्रीतम टाकलखेडे , देवराव लेकुरवाडे आदीने पुष्प अर्पित व अभिवादन करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास गावकरी बहु स्ख्येंने उपस्थित होते.
*कांद्री ग्रामपंचायत कार्यालय , कन्हान*
कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण माजी उपसरपंच धनराज कारेमोरे यांनी केले .
यावेळी ग्रा.पं. सदस्या आशाताई कनोजे , दुर्गाताई सरोदे , वर्षा खडसे , ग्रा.पं. सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , शिवाजी चकोले , महेश झोडावणे , राहुल टेकाम , बंटीजी आकरे , गणेश सरोदे , कृष्णा वरकडे , महेंद्र मेश्राम , पंकज मस्के , तसेच आदी ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.
*वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर*
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले , कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामनराव मेश्राम , जिगर कनोजिया , आर्यन शेल्लारे , रोहित राजेश कनोजिया , निखिल मेश्राम , सतीश ढबाळे , छोटेलाल माणिकपुरे , राहुल मोटघरे , राहुल बेलेकर , ओम तेलंगे , मनिष नंदेश्वर , सह आदि नागरिक उपस्थित होते .
*येसंबा ग्रामपंचायत , कन्हान*
येसंबा ग्रामपंचायत कार्यालय कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित फुलचंदजी इरपाते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी , अधिकार्यांनी , नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची प्रास्ताविका कुमारजी गडे यांनी मांडली असुन कार्यक्रमाचे सुत्र संचालन सोनु इरपाते यांनी केले .
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत उपसरपंच रविन्द्र बांगडे , सदसू पंकेश्वर चकोले , सदस्या वनिता राऊत , प्रतिमा हारोडे , कार्तिक भोयर , माया चकोले , भोजराज घरजाळे , मनोहरराव नागपुरे , बबनरावजी घरजाळे , सुषमा गजभिये , अरूणा बांगडे विठ्ठलराव महाल्ले , शिशुपाल पाणतावणे , हरिदासजी ऊके , रविशंकर हारोडे , मनोज राऊत , प्रेषित चकोले , बंटी मडावी , रितेश गजभिये , विशाल घरजाळे , कल्याणी इरपाते , शुभांगी इरपाते ,छकुली इरपाते , ओमराज कडु , अंकित घरजाळे , यशवंत महाल्ले , गौरव महाल्ले , रूपेश राऊत , तेजस धुर्वे , संजय गजभिये , सह गावातील प्रतिष्ठित नागरिक , मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*एम.जी.एस संघटन कन्हान*
एम.जी.एस संघटन कन्हान द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नेवालाल पात्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित दिपचंद शेंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शिव जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी एम जी एस संघटन चे अध्यक्ष गणेश भालेकर , उपाध्यक्ष समशेर पुरवले , सचिव अर्जुन पात्रे , भुरा पात्रे , अरुण खडसे , प्रतिम खडसे , सन्नी पात्रे , नरेश हातागडे , किरण पात्रे , क्रिष्णा खडसे , ज्ञानेश्वर खडसे , विजय खडसे सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*खंडाळा घटाटे ग्रामपंचायत , कन्हान*
खंडाळा घटाटे ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य
निखिल पाटील , रवींद्र केणे , मनीषा हटवार , सह आदि ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी नागरिक उपस्थित होते .
*शिवभक्त युवा प्रतिष्ठान कान्द्री , कन्हान*
शिवभक्त युवा प्रतिष्ठान कान्द्री च्या वतीने विविध कार्यक्रमाने शिवजयंती थाटात साजरी करण्यात आली . शहरातील शिवभक्त युवकांनी अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध ठीक ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण केले . त्यात शिवाजी नगर कन्हान , बस स्टॉप कान्द्री येथे माल्यार्पण केले . त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी लोकेश अंबाडकर , शुभम देशमुख , सागर कनोजे , सुरज ठाकरे , प्रजू मेश्राम , अनिकेत गिर्हे ,राहुल मस्के , विक्की आकरे , गणेश ठाकरे , गणेश आकरे , आशिष जिभकाटे , बादल देशमुख , अक्षय सरोदे ,चेतन मस्के , हिमांशू मेहरकुळे , ऋषिकेश कामडे , सह आदि शिवभक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते .