*मंत्री नवाब मलिक यांच्या वर केलेली कारवाई तात्काळ रद्द करण्याची मागणी*
*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ई डी च्या केंद्रीय पथकाने कोणतीही पुर्व सुचना न देता अटक करण्यात आल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष सचिन आमले यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदारांना निवेदन देऊन मंत्री नवाब मलिक यांच्या वर केलेली कारवाई तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे .
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास , औकाफ कौशल्य विकास , व उद्योजगता विभागाचे विद्यमान कैबिनेट मंत्री नवाब मलिक यांना केंद्र सरकार च्या नियंत्रण असलेल्या ई डी च्या केंद्रीय पथकाने कोणतीही पुर्व सुचना न देता एका खोट्या गुन्ह्यात भल्या पाहते चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी याचा जाहिर निषेधार्थ तालुका अध्यक्ष सचिन आमले यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदारांना निवेदन देऊन मंत्री नवाब मलिक यांच्या वर केलेली कारवाई तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी संगीत भारती , सचिन ईवटे , प्रणय गोमाये , पुरनदास तांडेकर , कैलाश हिवशे , पवन वानखेडे , हिमांशु येरखेडे सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .