*एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु*

*एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील एसंबा-वाघोली रोड वरून रात्रीला अवैद्य कोळसा व रेती वाहतुक करणारे टँक्टर, ट्रक चोरीने बिनधास्त धावत असल्याने पहाटे सकाळी एका ट्रक चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन रस्ता पार करणाऱ्या वन प्राणी हरिणाला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही माहिती वन विभाग व कन्हान पोलीसाना दिल्याने पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत हरिणाला अज्ञात दोन व्यकती हरिणाला शेतात घेऊन जातांना वनमजुरास दिसल्याने ते दोघेही मृत हरिणाला शेतात सोडुन पळुन गेले. मृत हरिणाचा पंचनामा करून पुढील तपास वन विभाग व पोलीस स्टेशन कन्हान करित आहे.


वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान व गोंडेगाव, घाटरोहणा, एंसबा परिसरात अवैद्य कोळसा व रेती चोरीचा धंदा बिनधास्त सुरू असुन असामाजिक तत्वाची मंडळी अवैद्य कोळसा व रेतीची वाहतुक पहाटे सकाळी टँक्टर, ट्रकने एंसबा ते वाघोली या मधल्या रोडने नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा ने रामटेक, नागपुर कडे करित असल्याने रविवार दिनांक २७ फेब्रुवारी ला पहाटे सकाळी ४ ते ५ वाजता दरम्यान अश्याच एका ट्रक चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन एंसबा-वाघोली रोडवरील नाग मंदीर जवळील वळणावर रस्ता पार करणाऱ्या एका हरिणाला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घट नास्थळी मृत्यु झाला. घाटरोहणा-एंसबा ग्रामपंचायत सदस्य अतुल गोरले हे सकाळी शौच्छास जात असतांना रोड वर हरिणाचा ट्रकच्या धडकेत रक्त स्त्राव होऊन मृत पावल्याचे दिसल्याने त्यानी वन विभाग पटगोवारी व पोलीस स्टेशन कन्हान ला माहीती दिल्याने बखारी येथील वन मजुर ज्ञानेश्वर खंडाते, लिलाधर ठाकरे हे वरिष्ठाच्या आदेशाने घटनास्थळी पोहचले तर पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात दोन व्यकती मृत हरिणाला शेतातुन ओढत घेऊन जातांना दिसल्याने पाठलाग केला असता ते मृत हरिणाला शेतात सोडुन पळुन गेले. पटगोवारी वन विभागाचे वनरक्षक श्रीकांत टेकाम हयांनी वनमजुर भोंडेकर ला सामोर पाठविले. कन्हान पोलीस स्टेशन चे पोहवा मोहन शेळके, नापोशि सुधिर चव्हाण, चालक जितेंद्र गावंडे आदीने घटनास्थळाचे निरिक्षण करून भोला कांबळे च्या शेतातील मृत हरिणाला बखारीचे वनमजुर ज्ञानेश्वर खंडाते, लिलाधर ठाकरे यानी घटनास्थळी आणुन पंचनामा करून आपल्या ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही वन विभागाचे वन रक्षक श्रीकांत टेकाम, वनमजुर भोंडेकर हे करीत आहे. या प्रसंगी घाटरोहणा(एंसबा) ग्रामपंचायत सदस्य अतुल गोरले , गोपाल गिऱ्हे , नांदगाव उपसरपंच सेवक ठाकरे , धर्मदास उके , गोपाल तिरकमठे , लक्ष्मीकांत काकडे , अजय ठाकरे , अधिकरण सुर्यवंशी , कुंदन ठाकरे , निखिल गिऱ्हे सह एंसबा, नांदगाव, वाघोली चे शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एंसबा, वाघोली च्या नागरिकांच्या येजा करण्याऱ्या गाव रस्त्या वरून कोळसा , रेती च्या टँक्टर , ट्रक ची वाहतुक बंद करण्याची मागणी चर्चेतुन करण्यात येत होती.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …