*मनसर कडे जाणाऱ्या सव्हिस रोडावरून दुचाकी वाहन चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या मनसर कडे जाणाऱ्या सव्हिस रोडावरून कोणीतरी अज्ञात आरोपी ने दुचाकी वाहन चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारी ने कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हादाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार (दि.१८) फेब्रुवारी ला सायंकाळी ५ वाजता च्या दरम्यान आकाश शेरसिंग उइके वय २० वर्ष राह. वार्ड क्र.४ शिवनगर कांद्री यांचा भाऊ सुनिल यादव याला गोरखपुर येथे लग्नासाठी जायच असल्यामुळे त्याने त्याची दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए एन ७११३ ज्याचा चेसिस क्र. एमव्हीएलएचए १०बीएफईएलच०५८९३ व इंजिन क्र. एचए१०ईआर ईएचएल५५१७९ असा असुन स्लिव्हर ब्लॅक रंग असुन दुचाकी वाहनाची चाबीनीशी आकाश उइके च्या ताब्यात दिली होती. त्याचे मित्रासह तो गोरखपुर येथे निघुन गेला. तेव्हा पासुन आकाश शेरसिंग उइके हा आपल्या मित्राचा दुचाकी वाहन वापरत होता. (दि.२२) फेब्रुवा री २०२२ ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान आकाश शेरसिंग उइके हा मित्र सुनिल शाहु यांचेसह दुचाकी वाहनाने कन्हान कडुन मनसर कडे जाणाऱ्या सव्हिस रोड वर आकाश शेरसिंग उइके यांनी दुचाकी वाहन उभी करून बाथरूम करिता थोडा समोर गेला असता परत आल्यावर अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात आरोपीने दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए एन ७११३ किंमत अंदाजे १२,००० रुपये ही चोरून नेल्या ने तीन दिवस शोध घेतला असता मिळुन न आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी आकाश शेरसिंग उइके यांचे तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ८९/२०२३ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.