*कन्हान येथे भव्य चित्रकला स्पर्धा थाटात संपन्न*
*स्पर्धेत प्रथम अदिती रायपुरकर , द्वितीय भावना घोगले , आणि तृतीय वेदिका महल्ले*
*माझी वंसुधरा अभियान अंतर्गत कन्हान – पिपरी नगर परिषद द्वारे चित्रकला स्पर्धेचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे माझी वंसुधरा अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार ला नवीन नगर परिषद इमारत येथे मान्यवरांचा हस्ते चित्रकला स्पर्धेत प्रथम , द्वितीय , आणि तृतीय आलेल्या विजेत्यांचा बक्षीस , रोख सम्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
दिनांक २३ फेब्रुवारी ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ च्या कालवधी पर्यंत कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे माझी वंसुधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत कन्हान शहरात पर्यावरण , जल , अग्नी , वायु , वृक्ष , इत्यादी विषयांवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . या चित्रकला स्पर्धेत छोट्या मोठ्या मुली सह ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला असुन बुधवार दिनांक २ मार्च २०२२ ला नवीन इमारत नगर परिषद कार्यालय मध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक अदिती रायपुरकर , द्वितीय पारितोषिक भावना घोगले आणि तृतीय पारितोषिक वेदिका महल्ले , चतुर्थ पारितोषिक मंजिरी मेहरकुळे , पाचवे पारितोषिक रेहा खेरवडे यांना मिळाल्याने मान्यवरांचा हस्ते
बक्षीस , रोख सम्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन पहिल्या पंधरा स्पर्धकांना सम्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार देण्यात आले असुन
सर्धेत भाग घेणार्या सर्व ६४ स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक , रोख रक्कम व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन चित्रकला स्पर्धा थाटात संपन्न करण्यात आली .
या प्रसंगी नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौणिकर , रेखा टोहणे , नोडल अधिकारी संकेत तलेवार , स्वच्छता निरीक्षक विनोद मेहरोलिया , हरीष तिडके , पत्रकार रुषभ बावनकर , भरत पगारे , दिनेश नानवटकर , रामदास संतापे , रविंद्र पाहुणे , आशिक पात्रे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .