*शासकीय स्तरावर तात्काळ निधी उपलब्ध करुन मोक्षधाम घाट व इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी* *सामाजिक कार्यकर्त्यांचे नप मुख्याधिकारी , जिल्हा परिषद अध्क्षा व संबंधित विभागाला निवेदन*

*शासकीय स्तरावर तात्काळ निधी उपलब्ध करुन मोक्षधाम घाट व इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी*

*सामाजिक कार्यकर्त्यांचे नप मुख्याधिकारी , जिल्हा परिषद अध्क्षा व संबंधित विभागाला निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी लालुक्यातील कन्हान – पिपरी नगरपरिषद ही सर्वात मोठी असुन सुद्धा शहरामध्ये मोक्षधाम अंतिम संस्कार दहन घाट उपलब्ध बांधकाम न झाल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व दिपक तिवाडे यांनी नप मुख्याधिकारी , जिल्हा परिषद अध्यक्षा व संबंधित अधिकार्यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन शासकीय स्तरावर तात्काळ निधी उपलब्ध करुन मोक्षधाम घाट व इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे .
कन्हान ग्रामपंचायत चे रुपांतरण‌ नगर – परिषद मध्ये होऊन जवळपास आठ ते नऊ वर्ष झाले असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन व संबंधित अधिकार्यांचा दुर्लक्ष ते मुळे आज पर्यंत शहरामध्ये आधुनिक युगाचे सर्व सुविधा युक्त मोक्षधाम अंतिम संस्कार दहन घाट निर्माण कार्य उपलब्ध झाले नसुन सुद्धा नगर परिषद प्रशासन व संबंधित अधिकारी कुंभकर्णी च्या झोपेत असुन अश्या ज्वलंत समस्येमुळे कन्हान – पिपरी शहरा मध्ये मृत पावला नंतर ही यातना सहन करावा लागत आहे . पारशिवनी तालुक्यातील कन्हान – पिपरी नगरपरिषद ही सर्वात मोठी नगर परिषद असुन सुद्धा जवळपास शहराची लोकसंख्या बघितली तर पन्नास हजार पेक्षा जास्त असुन सुद्धा या गंभीर समस्या कडे नगर परिषद प्रशासन व संबंधित अधिकारी कान्हाडोळा करीत असुन ग्रामीण भागात खेड्या गावा मध्ये अंतिम संस्कार दहन घाट बांधकाम झाले असुन उपभोग सुद्धा घेत आहे .


या गंभीर समस्या के शहरातील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांनी लक्ष केंन्द्रीत करुन नप मुख्याधिकारी संदिप बोरकर , जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे , व संबंधित अधिकार्यांशी भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन कन्हान नदी लागत असलेल्या रिकाम्या जागी काठावर उपलब्ध असलेल्या जागेश्वर मोक्षधाम अंतिम संस्कार दहन घाट बांधकाम करीत चार दहन शेड , दोन शोकसभा हाॅल , पिण्याचा पाण्याची टाकी , परिसरात गुट्टू ग्रेनाइट , झाडे वृक्षारोपण सौंदर्यीकरण सह आदि आधुनिक सुविधा युक्त बांधकाम करण्याकरिता शासकीय निधी फंड उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी विनोद येलमुल , मिलिंद मेश्राम , दिपक तिवाडे , रमेश ठाकरे , राजु कावळे , शिवशंकर भोयर , शुभम परतेकी , दिपक कुंभारे , प्रल्हाद पहाडे , चंदन मेश्राम , क्रिष्णा गावंडे , सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …