*अमिताभ बच्चन यांच्यासोबत देवलापार भागातील जि.प.सदस्यानी बजावली भूमिका*
*झुंड चित्रपटात बजावली आईची भूमिका*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात कार्यरत जि.प.सदस्या सौ.शांताताई कुंभरे यांनी झुंड या चित्रपटेच्या नायिका रिंकू राजगुरू आदिवासी फुटबॉलपटू यांच्या आईची भूमिका बजावली आहे.हा चित्रपट काल रिलीज झाला असून त्यामुळे देवलापार क्षेत्रात एक जल्लोष उडाला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने नटलेल्या झुंड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 8 जानेवारी 2019 ला महानायक अमिताभ बच्चन रामटेक तालुक्यातील बेलदा या गावी आले होते.हे क्षेत्र अतिशय दुर्गम भाग असून जंगलाने व्यापलेला आहे.यावेळी बेलदा आणि जवळील घोटी या गावात झुंड चित्रपटासाठी चित्रीकरण करण्यात आले होते.बेलदा येथे राहणाऱ्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्या सौ.शांताताई कुंभरे यांनी या चित्रपटात भूमिका बजावत अमिताभ बच्चन यांच्यासोबत गोंडी भाषेनी संवाद साधला आहे.अमिताभ बच्चन यांना शांताताईंनी केलेल्या संवादाचे हिंदीमध्ये रूपांतर करून ऐकवण्यात आले आहे.या चित्रपटात अजून इतर काही स्थानिक नागरिकांना घेण्यात आला आहे. या चित्रपटामुळे रामटेक तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर धडकले आहे.चित्रपटात शांताताई कुंभरे व स्थानिक कलाकारांची भूमिका असल्यामुळे क्षेत्रातील नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.
याबाबत प्रतिनिधीने शांताताई कुंभरे यांची प्रतिक्रिया घेतली असता,त्यांनी चित्रपटात काम करण्याचे श्रेय पक्षशीला वाघदरे यांना दिला.त्यांच्यामुळेच मला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटात आदिवासी बहुल क्षेत्राचा उल्लेख आणि संस्कृती दाखविण्यात आल्याने आपल्याला समाधान वाटले असेही त्या म्हणाल्या..