*पबजी व ब्लू व्हेल पेक्षा घातक कँसीनो मनोरंजन*

*पबजी व ब्लू व्हेल पेक्षा घातक कँसीनो मनोरंजन*


*भाग दोन*
*उध्वस्त होतोय् युवा व विद्यार्थी वर्ग*

*क्षेत्रात व घरा-दारात वाढते भुरट्या चोरीचे प्रमाण*

*संबंधित विभाग लक्ष देतील काय…?*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः सावनेर शहरात जवळपास 10 च्या वर आँनलाईन लाटरी सेंटर व ईलेक्ट्रानीक कँसीनो सेंटर च्या आड मनोरंजनाच्या नावावर राजरोस पणे जुगार खेळल्या जात आहे व या अवैध व्यवसायात शालेय विद्यार्थी व युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनाचे वाटोळे करत असल्याची बातमी महाराष्ट्र न्यूज मीडिया वर प्रखरतेनी प्रकाशित करण्यात आली होती*
*मिळालेल्या माहीती नूसार सावनेर शहरात जवळपास दहाच्या वर असे कँसीनो सेंटर असून यात दररोज लोखोची रोख उलाढाल होत असुन सकाळ पासुन ते रात्री पर्यंत या कँसीनो सेंटर वर विद्यार्थी व युवा मंडळीची दररोज गर्दी असते.युवा वर्ग व विद्यार्थ्यांना या कँसीनोचा छंद असा जडला की सकाळ पासुन तर सायंकाळ पर्यंत कँसीनो सेंटर चा गराडा़ घालत असल्याचे आढळून येत आहे*
*विश्वस्त सुत्रादारे मिळालेल्या माहिती नुसार सदर कँसीनोतील इलेक्ट्रॉनिक मशीनीत तांत्रिक बिगाड करुण खेळणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्यात जात आहे खेळनारा “शंभर रुपये हारला तरी जिंकतो मात्र दहा रुपये” या पध्दतीने मशीनी सेट केल्याने हराणारा दररोज हजारो हारतो तर संचालक दररोज लाखोची माया गोळा करतो.एखादा नशीबवान पाच पंचवीस हजार जिंकला तर संचालक व त्याचे पोसलेले हस्तक त्यास जीतलेली रक्कम न देता हाकलुन लावतात किंवा “मशीन बरोबर नही है,फीर से खेल” असे म्हणत दमदाटी करुण त्यास जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दील्या जात असल्याचे वु्त्त आहे*

*पबजी व ब्लूव्हेल पेक्षा घातक*

*शहरात सुरु असलेला हा कँसीनो चा खेळ पबजी व ब्लू व्हेल पेक्षाही घातक असल्याचे दिसून येत आहे.ज्या प्रकारे युवा वर्ग पबजी व ब्लू व्हेल सारख्या आँनलाईन गेम च्या आहारी जाऊन आपल्या जिवनाचे वाटोळे करण्याच्या उंबरठ्या उभे दीसत आहे त्याच प्रकारे हा कँसीनो गेम ही यांचे जीवन उध्वस्त करण्यात काही कमतर नाही एकदा या खेळाचे व्यसन जडले की घरूण मिळनारे पाँकीट मनी,ट्यूशन फी,शालेय उपयोगा करिता मीळणारे अथवा घरकामा करीता लागणार्या साहित्यास मीळणारे पैसे हातात येताच कँसीनो शौकीनांचे पाऊले थेट कँसीनो सेंटर कडे़ वळतात सदर रक्कम हारल्या नंतर निरनिराळ्या खोटे प्रसंग सांगू रक्कम हरविल्याचे दर्शविण्याचे पर्व सुरु होते.आणी हळू हळू घरच्या पैश्यासोबतच इतर वस्तूंवर हाथ सफाईचा खेळ सुध्दा सुरु होणे अपेक्षितच अश्यातच शहरात भुरट्या चोरीचे प्रमाण सुध्दा वाढु लागले आहे*

*वेळ राहता संबंधित विभागाने सदर विषयावर गांभीर्याने लक्ष न दिल्यास स्थिती भयावह होऊण नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.सदर विषयावर आळा बसावा याकरिता संबंधित विभागाने शहरात सुरु असलेल्या कँसीनो सेंटर वर सुरु असलेल्या मशीनीचे तज्ञाकडून तपासणी करुण सदर मशिनीत तांत्रिक बिगाड आढळल्यास कँसीनो संचालकावर फसवेगीराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडित पालक वर्गातुन होत आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …