*रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ नागरिकांचे साखळी उपोषण ; मनसर- माहुली मार्गाची दुर्दशा,अपघाताचे प्रमाणही वाढले*
रामटेक – दुरुस्तीपासून वंचित असलेल्या मनसर माहुली रस्त्याचे एक वेगळेच चित्र दिसत आहे.ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले व त्यातच वाहनचालकांची होणारी कसरत यामुळे समस्थ माहुली व मार्गावरील इतर सर्व गावातील ग्रामस्थ त्रस्त झाल्याचे चित्र निदर्शनास येते आहे.मनसर माहुली हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे.या मार्गाची लांबी जवळपास 8 कि. मी.एवढी आहे.या मार्गावर माहुली,घुकसी, गुंडरी, काळाफाटा,सालई,पाली उमरी,चीचभुवन अशा गावांचा समावेश आहे.
या गावातील बहुतांश विद्यार्थी रामटेक ला शिक्षण घेण्यासाठी येत असतात.अशातच या रस्त्याची अशी अवस्था असल्याने अनेक नागरिक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे यासाठी माहुली येथील ग्रामस्थांनी दि.7/3/2022 ला केशव नगर माहुली या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.आता जवळपास उपोषणाचे 4 दिवस झाले आहेत.पण अद्यापही प्रशासनाचे अधिकारी तथा लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेले नाही अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.नागरिकांना त्यांच्या समस्या विचारले असता,मनसर माहुली मार्ग हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) सोपविण्यात यावे,रस्त्यावरील झाडे-झुडपे यांचा बंदोबस्त करणे तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे पाहता रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात यावे ह्या प्रमुख समस्या सांगितल्या.अशाच खराब रस्त्यामुळेच काळाफाटा येथील रहिवासी राजू शेषराव आदेवार यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.नागरिकांच्या समस्या जर लवकर मार्गी लावल्या नाही तर तीव्र आंदोलन करून अन्नत्याग करण्यात येईल असे ग्रामस्थांनी ग्वाही दिली आहे.उपोषणात प्रामुख्याने बंटी जयस्वाल,गुड्डू चौधरी, नत्थु बडे,लंकेश्वर पाटील,राकेश खिरेकार,प्रभाकर राऊत,मनोज गिरी,देवराव नारनवरे,प्रकाश दडमल,विकास दाडे, रोहित जयस्वाल तसेच आदी सर्व ग्रामस्थ उपस्तीत होते.