*पालोरा ते डोरली रस्त्याचे नुतणीकरण करण्याची मागणी*
*प्रहार विद्यार्थी संघटने चे तहसीलदारांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील पिपळा परसोडी ग्रामपंचायत अंतर्गत पालोरा ते डोरली रस्त्याचे नुतणीकरण संदर्भात प्रहार विद्यार्थी संघटने च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन व त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ रस्त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी केली आहे .
निवेदनात सांगितले कि गेल्या अनेक वर्षा पासुन रेती वाहतुकी मुळे पालोरा ते डोरली हा रस्ता पुर्णपणे खराब झाल्याने नागरिकांना , शाळकरी मुलांना , शेतकरी , रुग्णांना अडी अडचणीचा सामना करावा लागत आहे . या रस्त्याचे नुतणीकरण व्हावे या करिता प्रशासनास वरंवार निवेदन देण्यात आले असुन प्रशासन या कडे लक्ष केंन्द्रीत करत नसुन उदासीन असल्याचे निष्पन्न झाले . याच प्रमाणे गट ग्रामपंचायत पिपळा परसोडी यांनी दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी रेती निलामी संदर्भात रेती घाट देण्यात येऊ नये असा ठराव घेण्यात आला असुन सुद्धा प्रशासनाने रेतीघाट निलामी करुन प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत व स्थानिकांची दिशाभुल करुन फसवणूक केली आहे व या प्रकारास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाल्याने प्रहार विद्यार्थी संघटने च्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष अभिषेक ऐकुणकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन व त्यांना एक निवेदन देऊन पालोरा ते डोरली रस्त्याचे दुरुस्ती कार्य पुर्ण न होता रेती वाहतुक सुरु केल्यास वाहनांना रस्त्यावरच अडविण्यात येईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रहार विद्यार्थी संघटने च्या पदाधिकार्यांनी व नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे .