*स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण पथकाची गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैद्य कोळसा टालवर कारवाई* *कारवाई दरम्यान चोरीचा कोळसा सह एकुण ८८९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त* *कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण पथकाची गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैद्य कोळसा टालवर कारवाई*

*कारवाई दरम्यान चोरीचा कोळसा सह एकुण ८८९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त*

*कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरात मागील अनेक दिवसा पासुन कन्हान पोलीसांच्या मुक सगमतीने मोठ्या प्रमाणात अवैध कोळसा टाल सुरु आहे . १२ मार्च च्या कारवाई नंतर नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण पथकाने गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैध कोळसा टालवर धाड टाकुन वेकोलि खुली खदान येथुन चोरी केलेला १७.७९० टन दगडी कोळसा किंमत ८८९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आले.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान अंतर्गत वेकोलि उपक्षेत्र कामठी व उपक्षेत्र गोंडेगाव च्या तीन खुली कोळसा खदान परिसरात अवैद्य कोळसा चोरीचा धंदा जोमाने सुरू असुन अवैद्य कोळसा टाल चा ऊत आल्याने असामाजिक तत्वाचा बोलबाला वाढुन सामान्य नागरिकांना त्रास होण्याच्या तक्रारी वाढल्याने नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांचे आदेशाने स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करित असतांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून मंगळवार दिनांक.१५ मार्च च्या पहाटे सकाळी २ वाजता दरम्यान पहिली कारवाई केली असता १) अशोक बलराम यादव राहणार. टेकाडी वसाहत यांचा ताब्यातुन चोरीचा साठवुन ठेवलेला १० टन दगडी कोळसा किंमत ५०, ००० रूपए मिळून आला व त्याने हा कोळसा अभिषेक सिंग राहणार. इंदर कॉलोनी यांचे करीता घेतला असल्याचे सांगितले. तसेंच लगेच पुन्हा रात्री ३ वाजता दरम्यान दुसरे अवैध कोळसा टाल वर धाड टाकली असता आरोपी नामे राजु धनराज टेकाम वय २४ राहणार. गोंडेगाव यांचा ताब्यात अंदाजे ७.७९० टन कोळसा किंमत ३८९५० रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला. नमुद आरोपीने सदर चा कोळसा उमेश पानतावणे राहणार. कांद्री याचे करीता घेतला असल्याचे सांगितले. या दोन्ही अवैद्य कोळसा टालवरून चोरीचा कोळसा १७.७९० टन किंमत ८८९५० रूपयाचा जप्त करून यातील आरोपी १) अशोक बलराम यादव राहणार. टेकाडी वसाहत,२) अभिषेक सिंग राहणार. इंदर कॉलोनी, ३) राजु धनराज टेकाम राहणार. गोंडेगाव ४) उमेश पानतावणे राहणार . कांद्री या चार आरोपी पैकी दोघांना अटक करून दोन फरार आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता वेकोलि अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करून व त्यांच्या कडुन फिर्यादी घेऊन तसेच दोन्ही धाडी दरम्यान मिळलेल्या मालाचे वजन करून चारही आरोपी विरुद्ध अनुक्रमे १) अपराध क्रमांक १३३/२०२२ कलम ३७९, १०९ भादंवि, २) अपराध क्रमांक १३४ /२०२२ कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हे नोंद करून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन कन्हान चे ताब्यात देण्यात आले . ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनि अनिल राऊत, पोहवा विनोद काळे, नाना राऊत, अरविंद भगत, चालक साहेबराव बहाळे यांनी यशस्विरित्या पार पाडली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …