सावनेर स्थानिक न.प. अभ्यंकर प्राथमिक शाळेत विद्याथ्र्याच्या हस्तनिर्मित साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले .

*हस्तनिर्मीत साहित्य प्रदर्शनी*


सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर


सावनेरस्थानिक न.प. अभ्यंकर प्राथमिक शाळेत विद्याथ्र्याच्या हस्तनिर्मित साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ . रेखा ताई मोवाडे होत्या . प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीच्या नगरसेविका सौ . प्राजक्ता वानखेडे , तुषार उमाटे , मुख्याध्यापिका सौ . अनिता ग. झाडे आदी उपस्थित होते . दिप प्रज्वलन करून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले . मान्यवरांनी प्रदर्शनातील पाहणी करीत विद्याथ्र्यांचे विशेष कौतुक केले .नगराध्यक्षा सौ रेखा मोवाडे यांनी हस्त निर्मीत साहित्यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्य कलागुणांचा विकास होतो . त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले . प्रदर्शनासाबतच शाळेत बालसभा , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , क्रिडा स्पर्धा , नाटक , नृत्य, समुह गीत गायन इ़ . कार्यक्रम पार पडले . शाळेचे शिक्षक नरेंद्र चापरे, सुरेश गजभे , सुनंदा राऊत , गजानन पटले , माणिक रामटेके , ज्योती काडापे, नर्मदा डवरे , दिप्ती खोब्रागडे , प्रणाली मोरे , प्रज्ञा बागडे , अंजली पगारे , विजया वर्मा , अनुसया नारेकर आदींनी सहकार्य केले .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …