*मुलाला व आई वडीलांना चार आरोपी ने मारहाण करुन केले जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल* *होळी धुळीवंदन च्या दिवशी परिसरात घडली घटना*

*मुलाला व आई वडीलांना चार आरोपी ने मारहाण करुन केले जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*होळी धुळीवंदन च्या दिवशी परिसरात घडली घटना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दिड किलो मीटर अंतरावर असलेल्या रायनगर विकास शाळा मैदान जवळ मुलाला व आई-वडील ला चार आरोपींनी मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक .१८ मार्च २०२२ ला दुपारी १:४५ वाजता दरम्यान राजेंद्र बिरबल मेश्राम वय ५० वर्ष राहणार. हनुमान नगर कन्हान हे आपल्या घरी झोपले असता त्यांना घर मालक अन्नाजी सोनवने च्या पत्नी ने येऊन सांगितले कि तुम्हच्या मुलगा अनुराग मेश्राम ला काही मुले विकास हायस्कुल जवळ मारहा ण करीत आहे. अश्या माहिती ने राजेंद्र बिरबल मेश्राम हे लगेच आपल्या पत्नी सौ ज्योत्स्ना सह ऑटो ने विकास शाळेजवळील रायनगर कन्हान येथील मैदानाजवळ गेले असता तिथे आरोपी १) विवेक मेश्राम २) अमन कैथवार ३) नितिन खोब्रागडे ४) आशिष नागपुरे हे त्यांच्या मुलाला मारपीट करीत होते. हे पाहुण राजेंद्र मेश्राम व त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना या दोघांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने बासा च्या दंड्याने राजेंद्र मेश्राम यांच्या डोक्यावर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर तसेच त्यांचा पत्नी सौ ज्योत्स्ना च्या डाव्या मांडीला मारून गंभीर जख्मी केले. आणि जिवानिशी मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी राजेंद्र बिरबल मेश्राम च्या तोंडी तक्रारी वरून चार ही आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक. १५१/२०२२ कलम ३२४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …