*कन्हान येथे फुलाच्या वर्षाने होळी मिलन कार्यक्रम थाटात संपन्न*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोर असलेल्या ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते भारत मातेचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व फुलांचा वर्षाव करुन होळी मिलन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
रविवार दिनांक २० मार्च रोजी कन्हान शहर विकास मंच द्वारे होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र, ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार कमल सिंह यादव, सुनिल सरोदे यांच्या हस्ते भारत माते च्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना नोटबुक व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सहसचिव प्रकाश कुर्वे आदि सर्व पत्रकार बांधव व मंच पदाधिकार्यांनी फुलांचा वर्षाव करुन होळी मिलन च्या शुभेच्छा देण्यात आल्या .
या प्रसंगी अजय त्रिवेदी, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, रोहित मानवटकर , भरत पगारे , कन्हान शहर विकास मंच मार्गदर्शक भरत सावळे , कल्याणी शेंडे सह आदि नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे , सहसचिव प्रकाश कुर्वे सह आदि मंच पदाधिकार्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .