*सावनेर चे मुख्यधिकारी हर्षला राणे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करा ; मुख्यमंत्र्यांना पत्र*

*सावनेर चे मुख्यधिकारी हर्षला राणे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करा ; मुख्यमंत्र्यांना पत्र*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर: न.प.हद्दीत असलेल्या खेडकर ले आऊट मधील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानात लागून असलेल्या फलकाला सावनेर च्या मुख्यअधिकारी हर्षला राणे यांनी आकसापोटी काढून फकण्याच्या आदेशावरून स्थानिक जय शिवाजी सामाजिक संस्था , संभाजी ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी पक्षातर्फे मुख्यअधिकारी राणे यांना तात्काळ प्रभावान निलंबित करण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसिलदार प्रताप वाघमारे यांच्या मार्फत देण्यात आले .

*ज्या महापुरूषांमुळे हर्षला राणे मुख्यधिकारी पदावर बसून सावनेर मध्ये मिरवित आहे , त्या पदापर्यंत पोहचविणारे शिक्षण माँसाहेब जिजाऊ , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले , रमाबाई , अहिल्याबाई होळकर , प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांनी वेवस्थेशी केलेल्या संघर्षामुळे व बलिदानामुळे मिळाले . आज सावनेरच्या मुख्यधिकारी पदावर असलेल्या हर्षला राणे जिजाऊ उद्यानाचा ठराव होऊन ऊद्यान / बागिचाचे काम सुरू असतांना तेथे झाडे लावण्याच्या निमीत्याने येवून उद्यानात लागून असलेल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाचे फलक काढण्यात आले . यावेळी जय शिवाज सामाजिक संसथेच्या अध्यक्षांना माहित झाल्याने त्यांनी तो फलक पुन्हा जसाच्या तसा लावला परंतू सायंकाळी मुख्यअधिकारी राणे यांनी पुन्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून तो फलक काढण्याचे आदेश दिले . यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविल्याने पालिका कर्मचारी परत गेले . सावनेर येथील शिवाजी चौकाच्या बाजूला असलेल्या महामार्ग 69 खेडकर लेआऊट मधील न.प. मालकीच्या खाली जागेवर 2012 ला जय शिवाजी सामाजिक संस्थेने ठराव घेऊन त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंचे जिजाऊ उद्यान व जिजाऊंचे कांस्य धातूचे शिल्प व लगतच व्यायाम शाळा आणि वरच्या मजल्यावर वाचनालयाची निर्मीती करण्याबाबत कळविले होते . यासंमधी दि . 3.9.2013 रोजी नगर पालिकेने ठराव क्र . 6 नुसार सभेने विचार विनीमय करून असे ठरविले की मा . मुख्य अधिकारी यांनी नियमानुसार वरील ले आऊट मधील या संस्थेद्वारे मागणी केल्यावरून सदर्दु जागा वरील प्रमाणे कामाकरीता देणे नियमानुसार शक्य होत असल्यास शासनाच्या नियमांच्या अधिन राहून मुख्यधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी असे नमुद केले आहे .*

*तत्कालिन मुख्यअधिकारी संघमित्रा ढोके यांनो दि . 23.12018 रोजी दिलेल्या पत्रातमा . खासदार कृपालजी तुमाने यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमा अंतर्गत न.प. सावनेर अंतगत राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान येथे व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यास नगर परिषदेची हरकत नाही असे नमुद केले आहे . त्यामुळे ही जागा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान म्हणूनच संबोधण्यात येत असून त्या जागेचीही ओळख तशीच आहे . व याची पालिकेने नोंदघेतल्याच्या संमंधीत पत्रावरून लक्षात येते . मग आता आलेल्या व एक महीला असलेल्या मुख्यअधिकरी हर्षला राणे यांना उद्यानात लागलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाचा आकस कां ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .मुख्यधिकारी असलेल्या महिला जर महापुरूषाबद्दल आकस ठेवत असेल तर त्यांना पदावर रहाण्याचा अधिकार नसून हर्षला राणे यांना तात्काळ निलंबन करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे .*

*यावेळी जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले , संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष विनोद मानकर , अनिल घटे ( प्रवक्ते संभाजी ब्रिगेड ) , अॅड . गुजाजी बरडे , राष्ट्रवादी पार्टीचे ग्रामिण कामगार सेल चे जिल्हाध्यक्ष सुधाकर तिबोले व रा.का. ग्रामिण चे सचिव राजू खांडे , जिजाऊ ब्रिगेड च्या सुनिता ढोबळे , सुनिता गजभिये , ज्योति सोनटक्के , लता कापसे , निर्मला कांबळे , शांताबाई आरघोडे , प्रतिभा बोरकर , रेखा बोरकर , प्रशांत ठाकरे , मनिष घोडे , गजू कोमुजवार , तेजस ईंगोले , महेन्द्र इंगोले , संदीप भोंगाडे , मयुर नागदवणे , रमेश वानखडे , शकिल झेडोया , प्रशात दोरखंडे , सुरज ढोरे , योगेश ठाकरे , नरेन्द्र पारवे , विक्रम गमे , मेजर गणपती पठाणे , राजू सोनटक्के , स्वप्नील बलविर , पुरूषोत्तम काळे , अनिल वाट , मन्नू कडू सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

*तर मुख्यअधिकारी हर्षला राणे विरूद्ध आंदोलन*

*सावनेर शहरात अनेक अवैध ले आउट असून मुख्यअधिकारी या नविन अवैध लेआऊट पैशेघेऊन ला परवाणगी देत आहे . ही मुख्यधिकारी पदावर रूजू झाली तेंव्हापासून वारंवार सुट्यांवर जात आहे . कौडीचे काम करीत नाही . अनेक कामांची फाईले पेंडीग पडली आहे . शासनाचा फुकटचा पगार लाटत आहे . गावात रस्त्यावर फुटपाथ व्यवसायिक अतिक्रमण करून रस्ते अवरूद्ध करून बसलले आहे . मटन मार्केट परिसरात नागरिकांच्या नळातून गडर लाईचे पाणी जात आहे . प्रचंड टॅक्स वाढ व टॅक्स वाढीत प्रचंड भष्टाचार केलेला आहे . बाजाराचा प्रश्न अजूनही निकाली काढलेला नाही , तीकडे या मुख्य अधिकाऱ्यांचे लक्ष नाही तीला सावनेर मध्ये अवैध दिसले ते फक्त जिजाऊ उद्यानातील राष्ट्रमातेचे फलकच ! असले लोक मुख्यअधिकारी म्हणून पादावर रहाण्याच्या लायकिचे नसून हर्षला राणे यांना तात्काळ प्रभावाने मुख्यअधिकारी पदावरून निलंबीत करण्यात यावे अन्यथा हर्षला राणे यांच्या विरोधात राज्यभर निर्दशने आंदोलन करण्यात येईल . असा इशारा जय शिवाजी सा . संस्थेनी दीला आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …