*विद्युत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी*

*विद्युत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरा पासुन उत्तरेस ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरी (बोरडा) शेत शिवारातील श्री विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विद्युत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगोळी झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी व प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने परिसरातील शेतकऱ्यांची मोठी हानी टळली.


मंगळवार दिनांक .२२ मार्च २०२२ ला दुपारी बोरी (बोरडा) शिवारातील मारोती वाघमारे यांचे ५ एकर शेत शेतकरी विलास नान्हे हयानी बटई ने करून त्यात गहु लावला होता. आज शेता जवळच्या विद्युत खांबा च्या विधृत तारा एकमेकाना लागुन झालेल्या इलेक्ट्रीक स्पार्क च्या ठिणग्या शेतात पडुन दुपारी अचानक शेतातील उभ्या गव्हाच्या पिकास आग लागल्याचे परिसरातील शेतकऱ्यांना दिसताच आरडाओरड करून गावकऱ्यांना एकत्र केले. गट ग्रामपंचायत खेडी (बोरी) च्या सरपंचा छाया कोकाटे व उपसरपंचा संगिता देवराव इंगोले हयानी तहसिलदार, पोलीस स्टेशन, पटवारी, अग्निशामक ला माहीती देऊ न घटनास्थळी बोलविले. परिसरातील शेतकरी, ग्राप पदाधिकारी, प्रशासन अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थानी तातडीने मदत कार्य करून दोन अग्निशामक बंब च्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यत विलास नान्हे च्या ५ एक रातील उभे गव्हाचे पिक आगीने जळुन राखरांगोळी झाली. परंतु आजुबाजुच्या शेतातील गव्हाचे पिक वाचविण्यात यश आल्याने मोठी हानी टळली. ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र तिरोडे, प्रकाश कोकाटे, रमेश कोकाटे, पोलीस पाटील संदीप नेऊल, अनिल ऊके सह ग्रामस्थ शेतकरी आणि कन्हान पोलीस, अग्निशामक कर्मचारी , मंडळ अधिकारी बी जी जगधने, जे जी मेश्राम, डेकाडे तलाठी एस व्ही पलादूरकर, आर सावाईतुल, एम दुधे, भोसले, भारती वर्मा तसेच कोतवाल शालीक शेंडे आदीने घटनास्थळी पोहचुन सायंकाळ पर्यंत बचाव कार्य केले. घटनास्थळी शेतकरी विलास नान्हे यांचे ५ एकरातील उभे गव्हाचे पिक आगीत जळुन राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास आगीने हिसकाविल्याने झालेली नुकसान भरपाई पिडीत शेतकऱ्याला शासनाने तातडीने दयावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …