*कन्हान येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथिप्रमाणे जयंती सोहळा थाटात साजरा*
*शिवसेना कन्हान शहर , शिवाजी स्मारक समिति कन्हान व छत्रपती शिवाजी नगर मित्र परिवार कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शिवसेना कन्हान शहर , शिवाजी स्मारक समिति कन्हान व छत्रपती शिवाजी नगर मित्र परिवार कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथिप्रमाणे जयंती सोहळा दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला .
सोमवार दिनांक २१ मार्च ला शिवसेना कन्हान शहर , शिवाजी स्मारक समिति कन्हान व छत्रपती शिवाजी नगर मित्र परिवार कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथिप्रमाणे जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या हस्ते व नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन शिवाजी स्मारका पासुन भव्य मिरवणुक काढण्यात आली असुन ही मिरवणुक आंबेडकर चौक , सात नंबर नाका , तारसा चौक , गांधी चौक व जे एन रोड ने परत शिवाजी नगर येथे मिरवणुकीचे समापन करण्यात आले असुन सायंकाळी डांस कार्यक्रम घेण्यात आला असुन दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक २२ मार्च ला सकाळ पासुन सायंकाळ पर्यंत हेल्थ कार्ड , ई श्रम कार्ड , व आधार कार्ड अपडेट , मोबाइल लिंक व आदि शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या भव्य शिबीराचा १०० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला असुन सायंकाळी नागरिकांना भव्य महाप्रसाद वितरण करुन व विविध कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथिप्रमाणे जयंती सोहळा थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी नप उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , राजेंद्र शेंदरे , राजु भोस्कर , प्रेम रोडेकर , छोटु राणे , चिंटु वाकुडकर , हरीष तिडके , अजय चव्हान , मनिषा चिखले , लता लुंढेरे , शुभांगी घोघले , नगरसेविका मोनिका पौनिकर , वर्षा लोंढे , सह आदि शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .