*ऑनलाईन मोपेड गाडी बुकींग च्या नावाने १ लाख ३० हजार रूपयाची फसवणुक*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या जे.एन हाॅस्पीटल कांद्री येथील मयुर मल्लिक यांचे ऑनलाईन मोपेड गाडी बुकींग करून १ लाख ३० हजार रूपयाची अज्ञात दोन आरोपींनी फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी मयुर च्या तक्रारीवरून अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२ चे सायंकाळी ७ वाजता ते गुरूवार दिनांक.१० मार्च २०२२ चे दुपारी १ वाजता दरम्यान मयुर विपिन कुमार मल्लिक वय ३० वर्ष राहणार. वार्ड क्रमांक.१ कांद्री हयाने ऑनलाईन ओला इलेक्ट्रॉनिक मोबीलीटी प्राईवे ट लिमिटेड मध्ये मोपेड गाडी बुक केली. असता कोणीतरी अज्ञात दोन आरोपींतानी मयुर विपिन कुमार मल्लिक च्या फोन वरून बुकिंग करीता आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो वाॅट्सप वर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ४९९ रूपये भरा असे मयुर ला सांगुन वेळो वेळी त्याचा खात्या मधुन आरोपींच्या वेगवेगळ्या तीन खात्यावर एकुण १,३०,००० रूपये असे आरटीजीएस व गुगल पे द्वारे पाठविले तरी मयुर ला गाडी मिळाली नाही. आरोपींनी त्याच्या सोबत धोखाधळी करून त्यानंतर सुद्धा ट्रान्सपोर्ट चार्ज ची मांगणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि, माझ्या सोबत धोखाधळी होत असल्याने सदर प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी मयुर विपिनकुमार मल्लिक यांनी तोंडी तक्रार केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात दोन आरोपी विरुद्ध कलम ४२०, ३४ भादंवि ६६ (इ) माहिती तंत्र ज्ञान कायदान्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन दोन्ही आरोपींचा शोध घेत आहे.