*मोठी बातमी* *कन्हान येथे दोन युवका वर प्राणघात हल्ला , हालत गंभीर* *परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , पाच ते आठ आरोपी ने केला हल्ला*

*मोठी बातमी*

*कन्हान येथे दोन युवका वर प्राणघात हल्ला , हालत गंभीर*

*परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , पाच ते आठ आरोपी ने केला हल्ला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दिल्ली दरबार येथे पाच ते आठ आरोपींनी दोन युवकावर चाकु व तलवार ने वार करुन गंभीर जख्मी केल्याची घटना घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे .


सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ ला सायंकाळी ६ ते ७:३० वाजता च्या दरम्यान शुभम सलामे व रोहित यादव हे दोन युवक दिल्ली दरबार येथे बसले होते . या दरम्यान बाहेरुन पाच ते आठ आरोपींनी बार च्या आत मध्ये प्रवेश केला असता बार मध्ये बसलेले घायल शुभम यादव व रोहित यादव यांचा वर चाकु व तलवार ने मारुन गंभीर जख्मी केले .सदर घटना पुराना वाद विवादा वरुन झाल्याची माहिती मिळत आहे . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन घायल दोन्ही युवकाला प्रथम उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरांनी तपासुन परिस्थिति गंभीर असल्याने त्यांना नागपुर येथे मेयो रुग्णालय येथे भर्ती करण्यात आले आहे .


घटने नंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …