*कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे प्रस्थान*
*विविध ठिकाणी साई भक्तांनी फुलाच्या वर्षाने , शरबत , फळ , पानी बोटल वाटप करुन केले भव्य स्वागत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – श्री साई पालखी सोहळा समिति कन्हान द्वारे १२ व्या वर्षी श्रीराम नवमी उत्सव निमित्य कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असुन श्री साई मंदीर इंदिरा नगर , कन्हान येथे महाआरती व प्रसाद वितरण करून साई पालखी पदयात्रा काढण्यात आली असुन रस्त्यात विविध ठिकाणी साई भक्तांनी फुलाच्या वर्षाव करुन फळ , शरबत व पाणी बोटल वितरित करून भव्य स्वागत करून हर्षोल्लोहासात पदयात्रेचे शिर्डी करिता प्रस्थान करण्यात आले.
शनिवार दिनांक .२ एप्रिल २०२२ ला श्री साई पालखी सोहळा समिति कन्हान द्वारे १२ व्या वर्षी श्रीराम नवमी उत्सव निमित्य कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असुन साई मंदीर इंदिरा नगर कन्हान कमेटी पदाधिकारी यांच्या हस्ते पुजन , महाआरती व परिसरात प्रसाद वाटप करून पदयात्रा सुरूवात करित शहिद चौक , तारसा चौक
भ्रमण करून नागपुर , जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर आली असता जवाहर नगर येथे सामाजिक कार्यकर्ता सुरेश कळंबे व मीना कळंबे यांनी फुलाच्या वर्षाने व पाणी बोटल वितरीत करुन भव्य स्वागत केले असुन आंबेडकर चौक येथे संजीव दिपपती , अशोक पाटील व मित्र परिवार द्वारे शरबत व फळ वितरित करून हर्षोल्लोहासात स्वागत करून साई पालखी पदयात्रेचे कामठी मार्गे शिर्डी करिता प्रस्थान करण्यात आले .
या प्रसंगी सर्व साई भक्त व परिसरातील गावकरी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
साई पालखी पदयात्रा यशस्वीतेकरीता श्री साई पालखी सोहळा समिति कन्हान चे पदाधिकारी हे परिश्रम घेत आहे .