*कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी द्वारे भव्य स्वागत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – श्री साई पालखी सोहळा समिति कन्हान द्वारे १२ व्या वर्षी श्रीराम नवमी उत्सव निमित्य कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते . साई पालखी पदयात्रा आंबेडकर चौक कन्हान येथे आली असता राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी पारशिवनी तालुका व्यापारी संघटन अध्यक्ष संजीव दिपपती यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये फुलाच्या वर्षाव करुन फळ , शरबत व पाणी बोटल वितरित करून भव्य स्वागत करण्यात आले .
या प्रसंगी भेळन पुरवले , किशोर शेंडे , महेंद्र खडसे , श्यामलाल रोकडे , प्रफुल रोडके , रामलखन पात्रे , कैलाश भिवगडे , रविंद्र काळे , केतन भिवगडे , अक्षय रोकडे , गणेश दिपपती , सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .