*बोरी सिंगोर येथील फिर्यादी यांच्या शेतातुन अॅल्युमिनियम चा तार चोरी व पाच सिंमेट पोल चे केले नुकसान*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस आठ किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरी सिंगोरी येथे फिर्यादी यांच्या शेतातुन कोणीतरी अज्ञात चोराने एकुण ४५,००० रुपए चा मुद्देमाल व २५ , ००० रुपयाचे नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २८ मार्च चे रात्री ०८:०० वाजता ते मंगळवार दिनांक २९ मार्च २०२२ चे सकाळी ०९:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी संदेश चरणदास फुलेजले वय ३० हे आपल्या घरी हजर असता निखिल मोखारे राहणार बोरी सिंगोरी यांनी फोन करुन सांगितले कि त्यांचा शेतातील एम एस ई बी चे पाच सिंमेट पोल तुटुन पडले आहे आणि अॅल्युमिनियम चा तार चोरी गेला आहे . अशी माहिती मिळाल्याने फिर्यादी संदेश फुलेजले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याला अॅल्युमिनियम चे तार अंदाजे ३००० फुट पैकी १२०० फुट जागेवर पडलेला दिसला व १८०० फुट अॅल्युमिनियम तार किंमत एकुण ४५,००० रुपए चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे दिसले व ५ सिमेंटचे पोल तुटुन अंदाजे २५,००० रुपयाचे नुकसान झालेले दिसले अश्या फिर्यादी संदेश फुलेजले यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ , १३६ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .