*कन्हान येथे स्वर्ग श्री विश्वनाथ रहाटे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ पाणपोईचा शुभारंभ*
*सेवाधर्म हा मोठा गुण असून प्रत्येकाने आप आपल्या स्वकीयांच्या स्मृतिप्रित्यर्थ असे सामाजिक उपक्रम सुरू करावे – प्रकाश जाधव*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान येथील प्रतिष्ठीत नागरिक विश्वनाथ रहाटे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या स्मृती चिरकाल टिकण्यासाठी रहाटे कुटुंबीयांच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.
स्वर्ग श्री सिताराम रहाटे स्मृती बहुउद्देशिय संस्था व फेमस क्लाथ स्टोर्स कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने तारसा रोड चौक कन्हान येथे स्वर्ग श्री विश्वनाथ रहाटे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ जनसेवेकरिता पाणपोईचा रविवार दिनांक ३ ला शुभारंभ करण्यात आला.
पाणपोईचे उद्घाटन श्रीमती सुशीलाबाई रहाटे यांच्या हस्ते नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार, ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव , मराठा सेवा संघ नागपुरचे शहराध्यक्ष प्रमोद वैद्य , सचिव पंकज निंबाळकर , डॉ श्रीकृष्ण जामोदकर , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर , कन्हान – पिपरी नगर परिषद उपाध्यक्ष डँनियल शेंडे , फेमस क्लाथ स्टोर्स संचालक अमजद अन्सारी आदी उपस्थित होते.
सेवाधर्म हा मोठा गुण असून प्रत्येकाने आप आपल्या स्वकीयांच्या स्मृतिप्रित्यर्थ असे सामाजिक उपक्रम सुरू करावे असे आवाहन माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केले. उष्णतेची प्रखरता लक्षात घेता तसेच या चौकात बस स्टाप व व्यापाराचे केंद्र असुन परिसरातील आणि बाहेरगावचे प्रवाशी, शालेय विद्यार्थ्याची चांगलीच वर्दळ असल्याने येथे सार्वजनिक थंड पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता होती. या गरजेला लक्षात घेऊन स्वर्ग.श्री विश्वनाथ रहाटे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ सर्वसामान्याच्या सेवेकरिता थंड पाण्याच्या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खिमेश बढिये यांनी केले तर आभार मोतीराम रहाटे यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रभाकर महाजन, शांताराम जळते, संजय निंबाळकर, डॉ हुकुमचंद काठोके, ताराचंद निंबाळकर, पुरूषोत्तम बेले, नेवालाल पात्रे, राजेंद्र खंडाईत, गणेश माहोरे, नथुजी चरडे, नागोराव कडु, वसतराव इंगोले, राजेश राठी, सुतेश मारबते, संतोष दहीफळकर, अशोक खंडाईत, वामन देशमुख, भुषण इंगोले, विनायक काठोके, रिकेंश चवरे, नरेश सोनेकर, मायाताई इंगोले, कांताबाई पाजुर्णे, विद्या रहाटे, एस एन मालविये, रमेश गोळघाटे, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, सुर्यभान फरकाडे, गणेश खोब्रागडे, ऋृषभ बावनकर, निलेश गाढवे, आकाश पंडीतकर, दिलीप राईकवार, सय्यद जमाल, प्रमोद वानखेडे, संजय ठाकरे, प्रविण गोडे, केतन भिवगडे, प्रशांत मसार, गौरव भोयर, गजानन वडे, योगेश ठाकरे, गोविंद जुनघरे, माधव काठोके, शैलेश शेळकी, प्रेम धरमारे, सतिश कुथे, संदीप कुकडे, श्रावण खंडाते, बाळु नागदेवे, सचिन वानखेडे, शिवशंकर ब्राम्हणकर, अर्जुन रहाटे, उत्कर्ष रहाटे आदी उपस्थित होते.