*बोरडा सराखा येथे आजपासून अखंड भागवत सप्ताहाला सुरुवात. बोरडा येथील गावकरी व वारकरी सांप्रदायिक यांचे पुढाकार*

*बोरडा सराखा येथे आजपासून अखंड भागवत सप्ताहाला सुरुवात.
बोरडा येथील गावकरी व वारकरी सांप्रदायिक यांचे पुढाकार*

रामटेक प्रतिनिधी – पंकज चौधरी

रामटेक – पासून 15 कि.मी.असलेल्या बोरडा सराखा येथे आजपासून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे.वर्षानुवर्षे पार पडत असलेल्या कार्यक्रमाला कोरोना (कोविड-19) मुळे स्थगिती देण्यात आली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्यातील लावलेले सर्व निर्बंध दूर सारताच बोरडा येथील ग्रामस्थ व वारकरी सांप्रदायिक यांच्यातर्फे गुडीपाडवा ते श्रीराम नवमी पर्यंत अखंड भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे.प्रामुख्याने हे कार्यक्रम श्री.ह.भ.प.अर्जुनजी महाराज गिरडकर (आळंदीकर) मु.तारसा ता.मौदा हे पार पाडणार आहेत.रोज सकाळी 6 ते 7 काकडा भजन,सकाळी 9 ते 11 भागवत कथा,सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 भागवत कथा असे या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच रविवार दि.10/04/2022 ला श्रीराम नवमी निमित्त श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज टापरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून दुपारी 3 वाजता गावात भव्य मिरवणूक निघणार आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …