*शहीद राकेशच्या पार्थिवावर शासकीय इतमानाने अंतिम संस्कार*
विशेष प्रतिनिधि काटोल
काटोल–काटोलचे सुपुत्र राकेश सोनटक्के यांचेआसाम येथे युद्ध सरावात गंभीर जखमी झाल्याने २० दिवस मृत्यूशी झुंज देत कोलकत्ता आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५० वाजता उपचारा दरम्यान निधन झाले होते.
भारतीय लष्करा मध्ये कर्तव्यावर असलेले नायक राकेश देविदास सोनटक्के 502 आर्मी सप्लाय कोर आसाम डिंगजाम येथे युद्ध सराव करीत असतांना डोक्याला जबर जखम झाल्याने कोलकाता आर्मी कमांड हास्पिटल येथे भरती करण्यात आले होते राकेश पार्थिव मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री पेठबुधवार काटोल येथील राहते घरी आणण्यात येवुन अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यावेळी लोकांनी अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
दि. २७ नोव्हेंबर रोज बुधवारला सकाळी ९ वाजता शासकीय इतमामात अंत्ययात्रा काढण्यात आली पेठबुधवार येथुन निघालेली ही अंत्ययात्रा आययुडीपी मार्गे धवड पेट्रोलपंप, विश्रामगृह, बसस्थानक, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, पोलिस स्टेशन समोरुन शहिद स्मारक येथे पोहोचली त्याठिकाणी माजी सैनिक संघटनेचे रत्नाकर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी सलामी देऊन श्रद्धांजली वाहिली त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पाच मिनिटे थांबुन गळपुरा चौक, शारदा चौक, राममंदिर, महादेव मंदिर वडपुरा, भाटपुरा, हत्तीखाना, अण्णाभाऊ साठे नगर या मार्गावरून पेठबुधवार येथील स्मशानभूमीत पोहचल्यानंतर शासकीय इतमानाने गार्डस रेजिमेंट, आर्टिलरी रेजिमेंट व आर्मी सप्लाय कोअरच्या जवानांनी अखेरची सलामी देवुन अंतिम संस्कार करण्यात आले.