*आवारा भिंत बनवण्याची व अवैध पार्किंग हटविण्याची मागणी* *स्थानिक नागरिकांचे नप मुख्याधिकारी यांना निवेदन*

*आवारा भिंत बनवण्याची व अवैध पार्किंग हटविण्याची मागणी*

*स्थानिक नागरिकांचे नप मुख्याधिकारी यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक एक येथील विविध मागण्या सोडविण्याचा मागणी करिता स्थानिक नागरिकांनी काॅंग्रेस पार्टी महिला कन्हान शहर अध्यक्ष रिता बर्वे यांच्या नेतृत्वात व माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी केली आहे .


निवेदनात सांगितले कि प्रभाग क्रमांक एक येथील पाणी टाकी परिसराचे आवार भिंत बांधकामाचे निविदा मंजुर झाल असुन अंदाजे पत्रका मध्ये मंदीर आणि पाणी टाकीचा गेट हे सहा फुट रुंद असुन बांधकाम अंदाज पत्रका नुसार करण्यात यावे व काही लोकांनी ट्रॅक्टर , बोलेरो वाहनांची अवैध पार्किंग पाणी टाकी परिसरात बरेच दिवसा पासुन उभे करुन ठेवले आहे . ते वाहन परिसरातुन बाहेर काढुन नियमानुसार बांधकाम करण्यात यावे . जेने करुन वाद निर्माण होणार नाही . अशी मागणी स्थानिक नागरिकांनी काॅंग्रेस पार्टी महिला कन्हान शहर अध्यक्ष रिता बर्वे यांच्या नेतृत्वात व माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे .


या प्रसंगी मनोहरराव भुरे , मोहन मोखरकर , रामभाऊ ठवकर , रुषिकेश सेलोकर , मिथुन सुर्यवंशी , प्रमोद बावनकुळे , बापु चकोले , मंगला किरपान , छाया रंग , सुषमा भोषकर , नितु किरपान , भारती भोषकर , सरोज राऊत , उज्ज्वला लोडेकर , प्रगती बावंकुळे , वैशाली कभे , उर्मिला भोले , मुगा भोले सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …