*ब्रेकींग न्यूज*
*कँसीनो सेंटर वर गुन्हे शाखेची धाड*
*दोन आरोपी सह चार कँसीनो मशीन व दोन खुर्च्या जप्त*
*इतर कँसीनो संचालक भुमीगत*
*एक लक्ष बासष्ट हजार सातशे रुपयाचा ऐवज जप्त*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः शहरात कँसीनो सेंटरच्या आड़ अवैध व्यवसाय सुरु असल्याचे वु्त्त “महाराष्ट्र न्यूज मीडिया”वर प्रखरतेनी प्रकाशित करुण सुरु कसलेल्या अवैध व्यवसाय व सदर व्यवसायाच्या आहारी जाऊण आपल्या जिवनाचे व संसाराचे वाटोळे करत असलेल्या विद्यार्थी व युवा वर्गाच्या भवितव्याचा खेळ मांडून गडगंज माया गोळा करणार्या कँसीनो संचालकांच्या विरोधात सातत्याने प्रकाशित होत असलेल्या बातम्यांची दखल घेत सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथक सावनेर चे पीएसआय सागर कारंडे व त्याच्या सहकारी अधिकारी कर्मचारी यांनी बाजार चौकातील कँसीनो सेंटर वर धाड़ घालून चार इलेक्ट्रॉनिक कँसीनो मशीन सह दोन खुर्च्या व आरोपी सलीम शेख,आसीम खान दोन्ही राहणार कसाई पुरा यांना अटक करुन एकूण 1 लक्ष 62 हजार 700 रुपयाचा एवज जप्त करुण पुढील तपास सुरु केला आहे*
*कँसीनो सेंटर वर मशीनी मधे तांत्रिक बिगाड़ करुण मनोरंजनाच्या नावावर ग्राहकांची फसवणूक करणार्यांचे धाबे दणानले असुन अनेक कँसीनो सेंटर संचालकांनी आपले कँसीनो सेंटर बंद ठेवून तर काहीं संचालकांनी आपल्या कँसीनो सेंटर मधील तांत्रिक बिगाड़ केलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीनी दुरुस्ती करण्या करीता इकडे तीकडे नेत असल्याचे निदर्शनास येत असुन शहरातील सर्वच कँसीनो सेंटर मधिल सर्वच मशीनी तज्ञा मार्फत योग्य तपासणी करुण सदर मशीनीत बिगड़ आढळल्यास संचालकावर मनोरंजनाच्या आड फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे*
*आज झालेल्या कारवाईत पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कारंडे पीएसआय गुन्हे पथक सोबत हेका.तायडे,सुधीर यादगीरे,प्रकाश टोके आदींनी भाग घेतला आज पडलेल्या धाडी मुळे शहरातील कँसीनो संचालक भुमीगत झाल्याचे वु्त्त आहे*