*साहेब!आमच्या गावची शाळा सुरू करा हो!*
*विद्यार्थ्यांच्या पालकांचा शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश बच्चू कडू समोर फोडला टाहो*
*मंत्र्यानी दिले चौकशी चे आदेश*
कोंढाळी प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – पंचायत समिति अंतरगत 100%आदिवासी व वन ग्राम असलेल्या अहमदनगर येथील सुरू असलेली जि प शाळा येथील जि प शिक्षका कडून चुकिच्या अहवाल पाठविल्याने येथील जि प शाळा च बंद करण्यात आली व येथील 15विद्यार्थी चार किमी अंतरावरील हेटी येथील शाळेला जोडण्यात आली आहे , अहमदनगर व हेटी या भागात हिंस्र पशुंचा वावर आहे या मुळे लहान विद्यार्थ्यांना व पालकाना जीव मुठीत घेऊन शाळे करीता पाठवावे लागते,अशी माहीती देत सलील देशमुख यांनी सांगितले की
*साहेब !या बाबद माहिती अशी की वर्ष 2018या काळात येथील शिक्षकाने आदिवासी व वन ग्राम असलेल्या या प्राथमिक शाळेचा कमी पट संखेचा अहवाल सादर केला, या चुकिच्या अहवाला वरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद पुणे यांचे कार्यलयीन पत्रावरून येथील शाळेला बंद करावे लागले*
या प्रकरणी या भागाचे आमदार माननिय अनिल देशमुख साहेब व जि प सदस्य सलील देशमुख यांनी येथील विद्यार्थी व पालकांना नागपुर चे तात्कालिन सी ई ओ तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी (प्रा)यांचे समक्ष हाजर करून अहमदनगर शाळा सुरू करण्यासाठी मागणी केली मात्र, या शाळेचा युनिफाईड डिस्ट्रिक्ट इंन्फरमेशन सिस्टम फाॅर एज्युकेशन ( यु डीआय एस ) गोठविण्यात आल्याने हि शाळा अजूनही रितसर सुरू करण्यात आली नाही। मात्र सध्या माननिय अनिल देशमुख साहेब व सलिलजी देशमुख यांचे प्रयत्नातून एक शिक्षक तिथे दिला आहे मात्र यु डी आय एस सुरू झाल्यास अहमदनगर येथील आदिवासी, मागासवर्गीय शालेय विद्यार्थीना हक्काची शाळा मिळेल या करीता आपणाकडून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद पुणे यांचे कार्यलयला योग्य तो निर्देश द्यावा असा टाहो अहमदनगर चे विद्यार्थी व पालकांनी शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश बच्चू कडू समोर टाहो फोडला।
*राज्य मंत्र्यानी दिले चौकशी चे निर्देश*
*नागपुर येथील आढावा बैठकी दरम्यान अहमदनगर या गावची शाळा कां बंद करण्यात आली या बाबद शिक्षण उपायुक्त व जिल्हा शिक्षण विभाग यांचे वरिष्ठ अधिकार्यांनी अहमदनगर येथे जाऊन चौकशी करून अहवाल पाठविण्या चे निर्देश या प्रसंगी राज्य मंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांनी शिक्षण विभागांचे अधिकार्यानां दिले।*
*जाम प्रकल्पाचे खोलीकरणाची मागणी*
या आढावा बैठकी दरम्यान काटोल नरखेड पंचायत समिती चे महाविकास आघाडी चे सभापती उपसभापति जि प सदस्य तसेच ग्राम पंचायत कोंढाळी चे सरपंच केशव राव धुर्वे उसपरपंच स्वप्निल व्यास, ज्येष्ठ सदस्य संजय राऊत,पं स सदस्य अरूण उईके, माजी जि प सदस्य रामदास मरकाम यांनी या आढावा बैठकी दरम्यान जाम मध्यम प्रकल्पात मागील 25वर्षा पासुन साचलेला गाळ काढण्याची मागणी केली तसेच जाम नदी पुनर्जीवित करण्याचे कमा अंतरगत सालई कोंढाळी भागातून ये जा करण्या साठी बांधलेला बंधारा जूना झाल्याने पाणी झिरपून जाते या करीता या बंधारा दुरूस्त व विस्तारीकरणकामाला मंजूरी द्यावी अशी मागणी केली
*लघु पाटबंधारे विभागाने या प्रकरणी चौकशी करून आवश्य त्या उपाय योजना करन्याचे राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी सांगितले* ।
सोबतच गावातील विमुक्त व भटक्या जाती चे वस्तीविकास कार्य निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा ग्रा प कोंढाळी कडून करण्यात आली ।या आढावा बैठकीत काटोल विधान सभा मतदार संघातील आठ ही जि प ,व सतरा पंचायत समिती क्षेत्रातील पदाधिकारी व महाविकास आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते।
या प्रसंगी काटोल तालुक्यातील ज्येष्ठ नेते राहूल जी देशमुख, चंद्रशेखर चिखले, चंद्रशेखर कोल्हे ,वसंतराव चांडक डा अनिल ठाकरे,
, सलिलबाबू देशमुख, बालूजी जोध, सभापती एन एस रेवतकर, उप सभापती अनुराधा खराडे, पुर्व सभापति अनुप खराडे, संदिप वंजारी, गणेश चन्ने,मोवाडे, साठवणे, अय्यूब पठाण, संजय डांगोरे, रामदास मरकाम,अरूण उईके, निशिकांत नागमोते, जयंतराव टालाटूले, कोंढाळी चे सरपंच केशव राव धुर्वे ,उसपरपंच स्वपनिल व्यास ज्येष्ठ सदस्य संजय राऊत, मनिष फूके, आकाश गजभिये,नितीन ठवले, प्रशांत खंते,गुलाम बनवा तथा काटोल नरखेड तहसील के जिला पंचायत, पंचायत समिती, नगर परिषदेचे महाविकास आघाडी चे पदाधिकारी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी ही उपस्थित होते ।