*आदर्श हायस्कुल येथील शिक्षक हरीष गोंडाने यांच्या सेवानिवृत्त समारोह कार्यक्रम थाटात संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथील आदर्श हायस्कुल शाळेतील शिक्षक हरिष गोंडाणे यांच्या सेवानिवृत्त समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा हस्ते शिक्षक हरिष गोंडाणे यांना सम्मानचिन्ह , शाल श्रीफल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन सेवानिवृत्त करण्यात आले .
गुरूवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी आदर्श हायस्कुल शाळा कन्हान येथील वरिष्ठ गणित शिक्षक हरीष शामराव गोंडाणे यांच्या सेवानिवृत्त समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव भरत सावळे व प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक आनंदराव कावळे , आर व्ही गोड , संस्थेच्या सदस्या कुसुमबाई सत्येकार यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात संस्थेचे सचिव भरत सावळे यांनी आपल्या भाषणातुन त्यांना दिर्घ आयुष्याची व उज्ज्वल भविष्याची कामना केली असुन मुख्याध्यापिका श्रीमती सी एन मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनातुन श्री गोंडाणे सर यांच्या सारखे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी होण्याचे उपस्थितांना आव्हाहन केले . त्यानंतर कार्यक्रमात वरिष्ठ गणित शिक्षक हरिष शामराव गोंडाणे यांना सम्मानचिन्ह , शाल श्रीफल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन सेवानिवृत्त करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले .
या प्रसंगी प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका , आदर्श हायस्कुल कन्हान चे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन मनोज डोंगरे यांनी केले .