*टेकाडी येथे पी डब्लू एस काॅलेज द्वारे सात दिवसीय शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न*
*नागरिकांन मध्ये जनजागृति करुन विविध विषयाची दिली माहिती*
*असेच शिबीर पुढल्या वर्षी सुद्धा टेकाडी गावात घेऊन या – सरपंच सुनिता मेश्राम*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – टेकाडी येथे पी डब्लू एस काॅलेज द्वारे शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन काॅलेज च्या विद्यार्थी, विद्यार्थींनी व शिक्षकांनी नागरिकांना विविध जीवनावश्यक विषयी माहिती देऊन विविध कार्यक्रमाने शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
मंगळवार दिनांक २२ मार्च पासुन तर मंगळवार दिनांक २९ मार्च पर्यंत असे सात दिवस टेकाडी येथे पी.डब्ल्यू.एस कॉलेज चे प्रिन्सिपल डॉ.पाटील सर, विद्यापीठातील डॉ.कोरेटी सर, डॉ.गान सर, डॉ.सुशांत सर, डॉ.तागडे सर आणि विद्यार्थी , विद्यार्थीनीं द्वारे टेकाडी गावात शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या सात दिवस सर्व विद्यार्थी , विद्यार्थीनीं अतिशय चांगले कार्यक्रम प्रस्तुत केले असुन गावात जनजागृती रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला व आरोग्य आणि रोगराई या बाबतीत सुद्धा महत्वाची माहित गावातील नागरिकांना दिली . या बद्दल टेकाडी ग्रामपंचायत सरपंच सुनिता मेश्राम यांनी महटले कि असेच शिबीर पुढल्या वर्षी सुद्धा टेकाडी गावात घेऊन या. अशा शिबिरातून सर्वांच्या बुद्धीचा विकास होतो. सर्व विद्यार्थांना चांगल्या सवयी लागतात.
टेकाडी येथे पी.डब्ल्यू.एस कॉलेज द्वारे शिबीर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच सुनिता मेश्राम व सदस्यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थांचे आभार व्यक्त केले .
या सात दिवसीय शिबीर कार्यक्रम यशस्वी करण्यात करिता टेकाडी ग्रामपंचायत सचिव आतिश देशभ्रतार , सरपंच सुनीता मेश्राम , सदस्य सिंधू सातपैसे , मिना झोड , सुरेखा कांबळे , माया मांगटे , दुर्गा राजपूत , अरुण सूर्यवंशी , विनोद इंवाटे , सह आदि ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व गावतील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .