*टीव्ही अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे रामधाम येथे आगमन* *९ एप्रिलच्या रामायण महानाट्या दरम्यान राहणार हजर*

*टीव्ही अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे रामधाम येथे आगमन*


*९ एप्रिलच्या रामायण महानाट्या दरम्यान राहणार हजर*

रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी

रामटेक – तालुक्यातील तथा नागपुर – जबलपुर महामार्गावरील मनसर येथे असलेले रामधाम तिर्थक्षेत्र हे दुरवर प्रख्यात आहे, येथे निर्माण करण्यात आलेली धार्मिक बाबी तथा मनोरंजनात्मक बाबी लक्षात घेता याला ” विदर्भाचे कश्मीर ” अशी उपाधी सुद्धा देण्यात आलेली आहे. तेव्हा या रामधामची व येथे नविनच बनविण्यात आलेल्या लाईट हाऊस वाटर पार्क व रिसोर्ट बाबदची वार्ता काणी पडताच प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी येथे येत्या ९ एप्रिल ला भेट देणार आहे.
विशेष म्हणजे रामधाम येथे पर्यटक मित्र श्री. चंद्रपाल चौकसे यांनी आपल्या कल्पकतेतुन धार्मिक बाबींसह अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये आयुर्वेदात उल्लेख असल्याप्रमाणे बहुतांश वनस्पतींचे संवर्धन तथा जतन रामधाम येथे स्थापलेल्या ॲग्रो पार्क मध्ये करण्यात आलेले आहे. येथे भेट दिल्यावर त्याची प्रचिती पर्यटकांना येत असते. त्याचप्रमाणे येथे नविनच बनविण्यात आले ”सुवी बर्ड पार्क ” हे या परीसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे.मध्य भारतातील हे पहिलेच बर्ड पार्क असुन येथे नाना तऱ्हेचे पक्षी पहावयास मिळतात. तेव्हा या बर्ड पार्क ची ख्याती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. यासोबत विशेष एक मोठ्या व विशेषतः निसर्गाच्या सानीध्यातील परीसर पहाण्यासाठी येथे लंडन बस ची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. रामधाम येथे धार्मिक बाबीचा विचार केल्यास येथे सर्व तिर्थस्थळाचे दर्शन मोठ्या सहजतेने करता येते.


उल्लेखनिय म्हणजे याच रामधाम मध्ये जगातील सर्वात मोठ्या ”ओम” ची निर्मीती करण्यात आलेली असुन त्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकार्ड मध्ये सुद्धा झालेली आहे. आणि याच धार्मिक तथा पर्यटन याच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या रामधाम येथील लाईट हाऊस वाटर पार्क व रिसोर्ट तथा जगातील सर्वात मोठा ओम पाहण्यासाठी येत्या ९ एप्रिल ला हास्यजत्रा कार्यक्रम फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी भेट देण्यासाठी येणार असल्याची माहिती यावेळी रामधाम व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान ९ एप्रिल रामटेक येथील सुपर मार्केट मध्ये श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर होऊ घातलेल्या ”रामायण महानाट्यादरम्यानही ” ही अभिनेत्री हजर राहाणार आहे.
दरम्यान प्रख्यात रामधाम ची प्रचिती पहाता आजपावेतो अनेक राजकियांसह प्रख्यात कलावंतांनी या रामधाम तिर्थस्थळाला भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक धार्मिक तथा सामुहीक विवाहासारखे कार्यक्रम सुद्धा येथे अनेकदा व मोठ्या स्वरूपात पार पडल्याने येथे अनेक पर्यटकांसह नागरीकांनी भेटी दिल्या असुन रामधाम तिर्थक्षेत्र स्थापन करण्यारे पर्यटक मित्र श्री. चंद्रपाल चौकसे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …