*भारतीय संविधान दीन उत्साहात साजरा*

*भारतीय संविधान दीन उत्साहात साजरा*

खापरखेड़ा प्रतिनिधि – दिलीप येवले 

*दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दि. 26.11.2019. रोजी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळ प्रकाशनगर खापरखेडा यांच्या सयुक्त विद्यमाने आझाद मैदान प्रकाश नगर वसाहत येथे 70 वा भारतीय संविधान दिन हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजाराेहण व सामुहिकपने संविधान उद्देशिका चे वाचन करण्यात आले.*


*भारतीय संविधान दिनी सकाळी ८ वाजता आयु. काळे साहेब ( सिनियर मॅनेजर H.R. ) ह्यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविन्यात आला. तसेच ड्रॉ. मिलिंद भगत साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. तसेच ह्या दिनाचे औचित्य म्हणून या प्रसंगी संविधान उद्देशीका चे वाचन सामूहिकपणे करण्यात आले.*
*यानंतर सायंकाळी ८ वा. या कार्यक्रम चे प्रमुख वक्ते ॲड.अतुल पाटील ( सामाजिक कार्यकर्ता, नागपुर ) यांनी ‘भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास ‘ या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी डॉ.मिलिंद भगत ( वैद्यकीय अधिक्षक ) यांनी सुद्धा संविधान निर्मिती मागची पार्श्वभूमी यावर प्रकाश क्षोत टाकला.*
*तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश जी खंडारे साहेब ( मुख्य अभियंता, औ. वि. केद्र , खापरखेडा ) यांनी अध्यक्षीय भाषण केले.*
*या कार्यक्रमा करिता महीलावर्गमध्ये सौ. संगीता ताई खंडारे, सौ. लतिकाताई मेश्राम आणि सौ. माधवी ताई शेगोकार ह्या मंचावर उपस्थित होत्या.*
*या कार्यक्रमाचे संचालन श्री. बंडु आवळे तसेच आभार प्रदर्शन प्रल्हाद तिखाडे यांनी केले.*
*उत्सव समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी पने पार पडला.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …