*सभेतील विषयाला नामंजुर करण्याची मागणी*
*विरोधी पक्ष नगरसेवकांचे नप मुख्याधिकारी ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- कन्हान – पिपरी नगर परिषद येथे दिनांक १९/१/२०२२ चे विषय क्रमांक ९ मध्ये २६ जानेवारी , जागतिक महिला दिवस व इतर खर्चास मंजुरी देण्याकरिता सभे पुढे मांडण्यात आला . परंतु उपरोक्त कार्यक्रमास किती रुपये खर्च आला व ही माहिती आकडेवारी देण्यात आली नसुन व ते विषय न ऐकता कुठलीही चर्चा न करता मंजुर करण्यात आला तसेच ६/४/२०२२ चे विषय क्रमांक ५ ,६ , ११अ, ११ ब व विषय क्रमांक १६ मध्ये कुठलीही चर्चा न करता सदस्याना ह्या विषयावर चर्चा करु दिली नाही व माहिती दिली नाही विषयावर सविस्तार चर्चा करु दिली नसल्याने सदर विषयावर विरोधी पक्ष च्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला असुन नगर परिषद मुख्यअधिकारी राजेंद्र चिंखलखुदे यांना एक निवेदन देऊन सभेतील विषयाला नामंजुर करण्याची मागणी केली आहे . अन्यथा तीव्र आंदेलन करण्याचा ईशारा दिला आहे .
या प्रसंगी नगर परिषद नगरसेवक व गटनेते मनिष भिवगडे , नगरसेवक योगेंद्र कंगारी , नगरसेवक विनय यादव , नगरसेविका गुंफा तिडके , नगरसेविका पुष्पा कावळकर , नगरसेविका रेखा टोहणे , सह आदि उपस्थित होते .